घरक्राइमसंजय राऊतांच्या अडचणीत वाढ; साक्षीदाराला धमकावल्याप्रकरणी एफआयआर दाखल

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; साक्षीदाराला धमकावल्याप्रकरणी एफआयआर दाखल

Subscribe

मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांना धमकावल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात वाकोला पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात कालच रात्री उशिरा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) संजय राऊत यांना अटक केली. आता या एफआयआरमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

- Advertisement -

मनी लॉण्ड्रींग कायदा २००२ अंतर्गत नोंदवण्यात आलेल्या गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पामधील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी ईडीचे पथक काल सकाळी सातच्या सुमारास संजय राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानी धडकले होते. नंतर सायंकाळी त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले व रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा – संजय राऊतांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली, ईडी कार्यालयाबाहेर करणार आंदोलन

- Advertisement -

यावरून केंद्रीय तपास यंत्रणा पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आल्या आहेत. महाराष्ट्र आणि शिवसेना कमजोर करण्याचे हे षडयंत्र असून खोटी कागदपत्रे आणि खोट्या जबानांच्या आधारे केस उभी केली जाते. राजकीय सूडापोटी हा खेळ सुरू आहे, असा आरोप काल संजय राऊत यांनी ईडी कार्यालयाबाहेर केला होता.

या दरम्यान पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांचे नाव घेतल्याचे तुम्ही ईडीला सांगा, असे आपल्याला सांगण्यात आल्याचे स्वप्ना पाटकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे वाकोला पोलिसांनी संजय राऊत यांच्याविरोधात कलम ५०४, ५०६ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – बाप्पासोबत खास फोटो: चिमुकल्या परीचा मराठमोळा साज; तिलाही लागलीय गणेशोत्सवाची आस

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -