घरताज्या घडामोडीरस्त्याच्या कंत्राटावरुन शिवसेनेच्या नेत्यांमध्ये हाणामारी; आमदारावर गुन्हा दाखल

रस्त्याच्या कंत्राटावरुन शिवसेनेच्या नेत्यांमध्ये हाणामारी; आमदारावर गुन्हा दाखल

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये काल तुफान हाणामारी झाली. शिवसेनेचे शहर संघटक सुशील खेडकर हे या मारहाणीत जखमी झालेले आहेत. ही मारहाण शिवसेनेचेच आमदार संजय शीरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी दोन्ही नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे सुशील खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा देवळाईत येथील रस्त्याच्या कामाचे कंत्राट देण्यावरुन हाणामरी झाल्याचे सांगितले जात आहे.

मागील अनेक दिवसांपासून सातारा देवळाईतील रस्ते कामाच्या कंत्राटावरुन दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरु होता. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. आमदार शीरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीत सुशील खेडकर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. खेडकर यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु असून शीरसाट आणि जंजाळ यांचे समर्थक देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.

- Advertisement -

खेडकर यांनी रुग्णालयात माध्यमांशी बोलताना सांगितले की, शिरसाट यांनी मला काल दुपारी त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले होते. त्यानंतर त्यांनी टेंडर मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. मी नकार दिल्यानंतर त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली. तसेच तिथे उपस्थित असलेल्या जंजाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील आपल्याला मारहाण केली असल्याचे खेडकर यांनी सांगितले. वेदांतनगर पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -