घरक्राइमविमानात सिगारेट ओढणे 'या' युट्यूबरला पडले महागात; एफआयआर दाखल

विमानात सिगारेट ओढणे ‘या’ युट्यूबरला पडले महागात; एफआयआर दाखल

Subscribe

विमानातून प्रवास करताना प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची बॉटल नेण्यास मनाई आहे. धुम्रपान अर्थात सिगारेट ओढण्यासही मनाई आहे. याबाबत वारंवार प्रवाशांना सूचना विमान प्रवासापूर्वी दिल्या जातात. मात्र तरीही एका यूट्यूबरने विमानात सिगारेट ओढली.

विमानातून प्रवास करताना प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची बॉटल नेण्यास मनाई आहे. धुम्रपान अर्थात सिगारेट ओढण्यासही मनाई आहे. याबाबत वारंवार प्रवाशांना सूचना विमान प्रवासापूर्वी दिल्या जातात. मात्र तरीही एका यूट्यूबरने विमानात सिगारेट ओढली. बॉबी कटारिया असे या यूट्यूबरचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी यूट्यूबर बॉबी कटारियाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी आयजीआय विमानतळ पोलीस ठाण्यात गंभीर कलमाअंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. (fir filed against you tuber bobby kataria for smoking in flight)

पोलिसांनी ज्या कलमांतर्गत एफआयआर दाखल केला आहे, त्यामुळे बॉबी कटारियाला जन्मठेपेची शिक्षाही होऊ शकते. शिवाय, पोलीस आरोपी बॉबीला लवकरच अटक करू शकतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bobby Kataria (@katariabobby)

- Advertisement -

यूट्यूबर बॉबी कटारिया विमानात सिगारेट ओढत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बॉबी कटारिया सिगारेट ओढत असल्याचे समजताच स्पाइसजेटच्या अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, बॉबी कटारिया 20 जानेवारी रोजी दुबईहून नवी दिल्लीला स्पाइस जेटच्या विमानाने गेला होता. 24 जानेवारीला त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो विमानात सिगारेट ओढताना दिसत आहे.

विमानात सिगारेट ओढण्याच्या बॉबी कटारियाच्या कृत्यामुळे विमानातील सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात टाकला होता. पोलिसांनी नागरी विमान वाहतूक कायदा 1982 च्या कलम 3C अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलिलांनी दाखल केलेल्या एफआयआरनंतर बॉबीला अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – बिल्किस बानो बलात्कार प्रकरण : जन्मठेपेची शिक्षा भोगणारे 11 आरोपी मुक्त

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -