घरमहाराष्ट्रनांदेड पोलीस हल्ला; गुरुद्वारा हिंसाचारात १८ जणांना अटक, ४१० जणांविरोधात गुन्हा दाखल

नांदेड पोलीस हल्ला; गुरुद्वारा हिंसाचारात १८ जणांना अटक, ४१० जणांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर

नांदेडमधील गुरुद्वाराबाहेर झालेल्या हिंसेत १८ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ४१० पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदेड जिल्हा प्रशासनाने वाढत्या कोरनाच्या पार्श्वभूमीवर शीख समजाला होळीनिमित्त काढण्यात येणाऱ्या हल्ला मोहल्ला मिरवणूकीची परवानगी नाकारली होती. होळी साणानिमित्त हल्ला मोहल्ला मिरवणूक काढण्यात येते. ही मिरवणूक मोठ्या प्रमाणात नांदेडमध्ये काढली जाते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वच धर्मांच्या सणावर निर्बंध घातले आहेत. शीख समाजाच्या हल्ला मोहल्ला मिरवणूक काढण्याची परवानगी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी नाकारल्यामुळे संतप्त शीख तरुणांनी नंग्या तलवारींसह पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्लाबोल केला. या हल्ल्यात ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

गुरुद्वाराबाहेर शीख समजाच्या तरुणांच्या जमावाने पोलीसांवर हल्लोबाल केल्याचे फोटे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये एका व्हिडिओत असे दिसत आहे की, गुरुद्वारामधून शीख तरुणांचा झूंड नंग्या तलवारींसह पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिशेने धावत आहेत. या हल्ल्यात संतप्त तरुणांनी रस्त्यावरील बैरिकेड तोडून टाकले आहेत. तसेच पोलीसांच्या वाहनांवर दगडफेक करत काचा फोडल्या आहेत. गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली असून गाड्यांच्या टायरमधली हवा काढून टाकली आहे. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

नांदेड पोलीस उपमहानिरीक्षक (डीआईजी) निसार तंबोली यांनी सांगितले की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हल्ला मोहल्ला मिरवणूक काढण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. याबाबत गुरुद्वारा समितीला माहिती देण्यात आली होती. गुरुद्वारा समितीने गुरुद्वाराच्या अंतर्गत परिसरात मिरवणूक काढणा असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु सोमवारी संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. प्रशासनाचे आदेशांना केराटी टोपली दाखवत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीस प्रतिबंध करण्यासाठी पोलीसांची तुकडी गेली असता संतप्त तरुणांनी पोलीसांशी हुज्जत घालत हल्ला केला. यामध्ये काही पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.

पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर

हल्ला मोहल्ला मिरवणूकीतील तरुणांनी पोलीसांच्या ७ वाहनांची तोडफोड केली आहे. तसेच या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या ४ पोलीस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात ४१० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय कायद्यानुसार सेक्शन ३०७,३२४,१८८,२६९ अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -