घरमहाराष्ट्ररश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ?; 'त्या' १९ बंगल्यांप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ?; ‘त्या’ १९ बंगल्यांप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

Subscribe

मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे हे १९ बंगले आहेत. हे बंगले असलेला नऊ एकरचा भूखंड रश्मी ठाकरे व आमदार रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या नावे असल्याचा आरोप आहे. कोर्लई ग्रामपंचायत अधिकारी व तत्कालीन सरपंच, सदस्य यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगनमत करून फसवणूक करणे, १९ बंगल्यांच्या कागदपत्रात खाडाखोड करणे, याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अलिबागः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कथित १९ बंगल्यांप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगिता लक्ष्मण भांगरे यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे हे १९ बंगले आहेत. हे बंगले असलेला नऊ एकरचा भूखंड रश्मी ठाकरे व आमदार रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या नावे असल्याचा आरोप आहे. कोर्लई ग्रामपंचायत अधिकारी व तत्कालीन सरपंच, सदस्य यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगनमत करून फसवणूक करणे, १९ बंगल्यांच्या कागदपत्रात खाडाखोड करणे, याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

आयपीसी कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८ व ३४ अंतर्गत तीन नगरसवेक, ग्रामसेवक, चार सरपंच आणि तत्कालीन सदस्य यांच्याविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास मुपडे करत आहेत. पोलिसांत याचा गुन्हा नोंदवल्याने रश्मी ठाकरे यांच्या अडचणी होण्याची शक्यता आहे.

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. किरीट सोमय्यांच्या आरोपांनुसार, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अलिबाग येथील कोर्लई ग्रामपंचायतीतील 19 बंगले स्वतःच्या नावावर करण्यासाठी पत्र लिहिले होते. हे पत्रदेखील किरीट सोमय्या यांनी माध्यमांमध्ये शेअर केले होते. त्यानंतर हे बंगले रश्मी ठाकरे यांच्या नावावर झाले. 2020 मध्ये त्यांनी 19 बंगल्यांचा मालमत्ता करही भरल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे. एवढेच नाही तर त्यापूर्वीची दोन वर्षे रश्मी ठाकरे यांनी आणि त्याआधी सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईक यांनी भरल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. हे बंगले रश्मी ठाकरे यांच्यासंबंधित असतानाही ते आता दिसत नाहीत, ते गायब केले आहेत का, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -