घाटकोपच्या मनसे विभागप्रमुखावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; अक्षय कुमारच्या बहिणीची केली खोटी सही

अभिनेता अक्षय कुमार याची बहिण अलका हिरानंदानी यांची बनावट स्वाक्षरी केल्याप्रकरणी मनसेचे घाटकोपरचे विभाग प्रमुख गणेश चुक्कल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलका हिरानंदानी यांची बनावट स्वाक्षरी केल्याने गणेश चुक्कल यांच्याविरोधात पवई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अभिनेता अक्षय कुमार याची बहिण अलका हिरानंदानी यांची बनावट स्वाक्षरी केल्याप्रकरणी मनसेचे घाटकोपरचे विभाग प्रमुख गणेश चुक्कल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलका हिरानंदानी यांची बनावट स्वाक्षरी केल्याने गणेश चुक्कल यांच्याविरोधात पवई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गणेश चुक्कल हे मनसेचे घाटकोपर पश्चिमचे विभाग अध्यक्ष आहेत. (FIR registered against MNS Ganesh Chukkal for forging the signature of actor Akshay Kumar sister)

बनावट स्वाक्षरी केल्याप्रकरणी अलका यांच्या कंपनीकडून याबाबत पवई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्याच्या या तक्रारीनंतर गणेश चुक्कल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गणेश चुक्कल यांच्या कंपनीला 3 वर्षासाठी फ्लॅट रेंटवर दिला होता. परंतु, बनावट कागदपत्राच्या माध्यमातून फ्लॅट 30 वर्ष भाड्याने दिल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश चुक्कल यांच्यावर 2 कोटींहून अधिक थकबाकी असून, अक्षय कुमारच्या बहिणीचा पवईच्या हिरानंदानी गार्डनमध्ये फ्लॅट आहे. हा फ्लॅट गणेश चुक्कल वापरत आहेत. याच फ्लॅटवरून फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, हे सर्व आरोप गणेश चुक्कल यांनी फेटाळले.

गणेश चुक्कल यांच्यावर अक्षय कुमारची बहीण अलकाची बनावट स्वाक्षरी केल्याचा आरोप आहे. पवईतील हिरानंदानी येथील फ्लॅट ३ वर्षासाठी भाड्याने दिला होता. करारानुसार गणेश चुक्कल यांना फ्लॅट खाली करायचा होता परंतु त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. चुक्कल यांनी फ्लॅट 3 नव्हे तर 30 वर्षासाठी भाड्याने घेतल्याचा करार असल्याचं म्हटलं. परंतु, अलका यांच्या कंपनीच्या वकिलांनी या कराराचा नकार दिला.


हेही वाचा – शिवाजी पार्कात ठाकरेंच्याच शिवसेनेचा ‘आवाज’; दसरा मेळाव्याला मुंबई हायकोर्टाची मंजुरी