प्राध्यापक मारहाण प्रकरण : महिलांना कुणी अपशब्द वापरल्यास असे गुन्हे अंगावर घ्यायला तयार – संतोष बांगर

शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून आमदार संतोष बांगर यांच्या मारहाणीचे दमदाटीचे व्हिडिओ समोर येत आहेत. याच मारहाणी प्रकरणी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासह त्यांच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून आमदार संतोष बांगर यांच्या मारहाणीचे दमदाटीचे व्हिडिओ समोर येत आहेत. याच मारहाणी प्रकरणी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासह त्यांच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर संतोष बांगर यांनी मी अनेक गुन्हे घ्यायला तयार असून, मी चौकशीला ही जाईन, असे सांगितले. (Fir registered against shinde group mla santosh bangar at hingoli)

प्राध्यपकांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी संतोष बांगर यांनी दोन दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. त्यानुसार, मीडिया सातत्याने संतोष बांगरची दादागिरी म्हणतोय. मात्र तुम्ही तिथे जाऊन दूध का दूध पानी का पानी करून दाखवावे. उपमुख्यामंत्र्यांना मी त्या महिलेची क्लिप ऐकवली त्यानंतर त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली, असा दावा बांगर यांनी केला होता. तसेच, “प्राध्यापकाला मारहाण केल्याचे प्रकरण आठ दिवसांपूर्वीच असून त्यावेळी ते शिक्षक का समोर आले नाहीत? त्या महिलेने उपमुख्यमंत्र्यांना घडलेला प्रकार सांगितला आहे. महिलांना कुणी अपशब्द वापरल्यास मी असे अनेक गुन्हे घ्यायला तयार आहे. चौकशीला समोर जायला तयार आहे”, असे बांगर म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संतोष बांगर यांनी मारहाण केल्याचे व्हिडीओ समोर येत आहे. नुकताच संतोष बांगर यांनी हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांच्या या मारहाण प्रकरणी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासह त्यांच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?

हिंगोली शहरानजीक असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती. उपाध्याय हे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक महिलांना त्रास देतात, असा आरोप करत बांगर यांनी त्यांना मारहाण केली. मारहाणीची ही घटना १८ जानेवारीला घडली. या घटनेनंतर प्रचार्यांनी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – नायगाव स्थानकात क्रेनची लोकलला धडक, मोटरमन जखमी