घरताज्या घडामोडीभंडारा आग दुर्घटना : दोन परिचारीकांविरोधात गुन्हा दाखल

भंडारा आग दुर्घटना : दोन परिचारीकांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

भंडारा आग दुर्घटने प्रकरणी दोन परीचारीकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंडार्‍यातील जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये लागलेल्या आगी प्रकरणी रुग्णालयाच्या दोन परिचारीकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिचारीका शुभांगी सातवणे आणि स्मिता आंबीलढुके, अशी या दोघींची नावे असून त्यांच्यावर निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करुन तपासाला सुरुवात केली होती. त्यानंतर आज रुग्णालयातील दोन परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिचारिकांच्या निष्काळजीपणाने ही घटना घडल्याचा आरोप केला आहे.

काय घडली होती घटना?

भंडार्‍यातील जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिशु केअर युनिटला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले होते. या शिशु केअर युनिटमध्ये १७ बालके होती. यापैकी ७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, या घटनेमध्ये दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या रुग्णालयात लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला होता. यासह रूग्णालयात अग्निशमन यंत्रणात अस्तित्वात नसल्याचेही अहवालात नोंदवण्यात आले होते.

- Advertisement -

असे काढले होते समितीने निष्कर्ष

भंडारा आग प्रकरणासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीने काही महत्त्वाचे निष्कर्ष काढले होते. त्यातील एक म्हणजे ही आग शॉर्ट सर्किटमुळेच लागली. या घटनेवेळी स्थानिक अग्निशमन दलाचे पथक वेळेत दाखल झाले होते. दरम्यान, या रुग्णालय इमारतीला फायर एनओसी नव्हती यासह कोणतीही आग प्रतिबंधक यंत्रणाही उपलब्ध नव्हती. तसेच रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षणही नव्हते.


हेही वाचा – मुंबईकरांसाठी महापालिकेचा Alert! ५ पेक्षा जास्त रुग्ण सापडताच इमारत होणार सील

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -