Pune Fire : पुण्यात लाकडाच्या गोदामाला आग, टिंबर मार्केटमधील घटना

पुण्यात आज पहाटे टिंबर मार्केट येथील लाकडाच्या गोदामाला आग लागली. आज (ता. 25 मे) पहाटे 4.15 वाजताच्या सुमारास ही आग लागली. या आगीमध्ये गोदामातील लाखो रुपयांचे लाकूड जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Fire at a wood godown in Pune, incidents in the timber market

गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. सुदैवाने या आगींच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आलेली असली तरी मोठ्या प्रमाणात वित्त हानी झालेली आहे. पुण्यात आज पहाटे टिंबर मार्केट येथील लाकडाच्या गोदामाला आग लागली. आज (ता. 25 मे) पहाटे 4.15 वाजताच्या सुमारास ही आग लागली. या आगीमध्ये गोदामातील लाखो रुपयांचे लाकूड जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Fire at a wood godown in Pune, incidents in the timber market)

हेही वाचा – कोरोना विषाणू कोण? हे जनता दाखवतेयं; ‘सामना’तील टीकेचा उदय सामंतांनी घेतला समाचार

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे पुण्यातील भवानी पेठ येथील प्रसिद्ध असलेल्या टिंबर मार्केटमधील लाकडाच्या दुकानाला आग लागली. या मार्केटमध्ये लाकडाच्या वस्तू मिळतात. त्यामुळे या लाकडी बाजारातून दररोज मोठी आर्थिक उलाढाल होत असते. याच मार्केट परिसरात असलेल्या रामोशी गेटजवळील लाकूड सामान असलेल्या गोडाऊनला पहाटे सव्वाचारच्या सुमारास भीषण आग लागली. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.

आगीने रौद्र रूप घेतल्याने गोदामाला लागलेली आग विझविण्यासाठी पुणे-पुणे कॅन्टोमेंट-पीएमआरडीए आणि पुणे महानगरपालिकेच्या 30 अग्निशमन वाहनांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यानंतर तब्बल साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग विझविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

या घटनेच्यावेळी अग्निशमन दलाने दाखवलेल्या प्रसंगावधानमुळे मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी दाखल होताच अग्निशमन दलाच्या जवानांनी शेजारील घरांमध्ये, शाळेमध्ये व परीसरामध्ये पसरू न देण्याची खबरदारी घेतली. तर आजुबाजूच्या परिसरातून 10 सिलेंडर तातडीने बाहेर काढण्यात आल्याने मोठा धोका टळल्याचे सांगण्यात आले आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर 20 अधिकारी व जवळपास 100 जवान आणि पुणे मनपा- पुणे कॅन्टोमेंट-पीएमआरडीए-पिंपरीचिंचवड अग्निशमन दल अशी एकूण जवळपास 30 अग्निशमन वाहने व खाजगी वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. सुदैवाने या घटनेत कोणीही जीवितहानी झाली नसल्याची सांगण्यात येत आहे.