घरमहाराष्ट्रपुण्यातील SVS सॅनिटायझर कंपनीत भीषण अग्नितांडव; १७ मजूरांचा मृत्यू

पुण्यातील SVS सॅनिटायझर कंपनीत भीषण अग्नितांडव; १७ मजूरांचा मृत्यू

Subscribe

उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॅालॅाजिस या रासायनिक कंपनीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. यामध्ये १७ कामगारांचा मृत्यू

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील एसव्हीएस कंपनीत भीषण अग्नितांडव झाल्याची माहिती मिळतेय. या आगीमुळे कंपनीमध्ये १० ते १५ मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुळशी तालुक्यामध्ये असलेल्या उरवडे गावाजवळ ही घटना घडली असून आग लागलेल्या या SVS कंपनीमध्ये सॅनिटायझरचे उत्पादन केले जाते. या घटनेमध्ये १७ कामगारांचा मृत्यू झाला असल्याचे  सांगितले जात आहे.

अशी घडली घटना

मुळशी तालुक्यामध्ये असलेल्या उरवडे गावाजवळ ही घटना घडली आहे. सॅनिटाइझर तयार करणाऱ्या SVS कंपनीला ही भीषण आग लागल्याची माहिती आहे. या आगीमुळं कंपनीमध्ये १० ते १५ मजूर अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली. यामध्ये बऱ्याच महिलांचा देखील समावेश असल्याचेही सांगितले जात आहे. उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॅालॅाजिस या रासायनिक कंपनीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. यामध्ये १७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १५ महिला २ पुरूष आहेत. यापैकी १३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज ४१ कामगार कामावर उपस्थित होते. १७ कामगार हे एसी लावून आतमध्ये माल पॅक करीत होते. त्यांची खोली बंद असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे या आगीत त्यांचा मृत्यू झाला. कंपनीत अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाटी JCB च्या साह्याने भिंती फोडून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे..

- Advertisement -

सॅनिटायझर हे अत्यंत ज्वलनशील असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आगीमध्ये नेमकी किती जिवीत हानी झाली किंवा आग लागण्याचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या कंपनीत लागलेल्या भीषण आगीला विझविण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. आतमध्ये अडकलेल्या मजुरांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आग मोठ्या प्रमाणात असल्याने आत अडकलेल्या मजुरांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले जात आहे. या परिसरामध्ये प्रचंड धुराचे लोट दिसत आहेत.

- Advertisement -

मुळशी तालुक्यातील उरवडे एमआयडीसीतील एसव्हीएस अक्वा टेक्नॅालॅाजिस या कंपनीला लागलेल्या भीषण आगीत १७ कामगारांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या दु:खातून सावरण्याची आई जगदंबा त्यांना शक्ती देवो, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले आणि भावपूर्ण श्रद्धांजली व्हायली आहे.

पुण्याच्या केमिकल फॅक्टरीत आग लागल्याची बातमी फार दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या सर्व मृत्यू पावलेल्या व त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर बरे करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो, असे ट्वीट केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

रासायनिक कंपनीतील आगीच्या चौकशीचे आदेश

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आले नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,”लअशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिली.

आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचे प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील आणि दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल, असे पवार म्हणाले.


… तर उत्तर कोरियातील नागरिकांना होणार थेट मृत्यूदंड! हुकूमशहा किम जोंग उनचा अजब फतवा

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -