घरमहाराष्ट्रपुण्यात प्रसिद्ध बेकर कंपनीला भीषण आग

पुण्यात प्रसिद्ध बेकर कंपनीला भीषण आग

Subscribe

या आगीमध्ये कोणीही जखमी किंवा जीवीत हानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुण्यातील विमाननगर भागातील बेकर्स कंपनीला भीषण आग लागली. ही आग आज सकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास लागल्याचे समजतेय. ही आग लागल्याने बेकर्स कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यात आली असून कुलिंगचे काम सुरू आहे. दरम्यान, या आगीमध्ये कोणतेही जीवीत हानी झाली नाही.

- Advertisement -

दरम्यान, या आगीबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या आगीमध्ये कोणीही जखमी किंवा जीवीत हानी झालेली नाही. ही आग कशाने लागली हे अद्याप अस्पष्ट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -