घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरऔरंगाबादमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग, घटनास्थळी ५ बंब दाखल

औरंगाबादमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग, घटनास्थळी ५ बंब दाखल

Subscribe

औरंगाबादमध्ये एका प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही आग वाळूज औद्योगिक वसाहतीतील जोगेश्वरी येथील चटईच्या कारखान्याला लागली आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाल मिळताच अग्निशमन दलाचे ५ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग मोठ्या प्रमाणात पसरू नये, यासाठी पाण्याचे टँकरही मागवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज एमआयडीसीमध्ये साहिल प्लास्टिक ही चटया बनवणारी कंपनी आहे. या कंपनीमध्ये सकाळी ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती समजताच अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. महापालिका, गरवारे कंपनी आणि बजाज कंपनी यांचे प्रत्येकी एक असे एकूण पाच बंब आणि पाण्याचे २० पेक्षा जास्त टँकर मागवण्यात आले आहेत. आगीमुळे लगतच्या सुंदर कॉलनी येथील ३ ते ४ घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान, घटनास्थळी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप इंगोले यांच्यासह पोलीस पथकाने हजेरी लावली. सुदैवाने या आगीत कुठलाही कामगार जखमी झालेला नाहीये. परंतु आगीमुळे धुराचे लोळ दूरपर्यंत पसरले आहेत. तसेच येथील नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे.


हेही वाचा : सरव्हायकल कॅन्सरचं प्रमाण का वाढतंय? तारुण्यातच कसा रोखाल धोका?

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -