घरताज्या घडामोडीपुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग

Subscribe

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुण्याच्या मांजरी परिसरातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागल्याचे समोर आले आहे. आगीच्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

- Advertisement -

अडकलेल्यांना बाहेर काढण्यात यश

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सर्वप्रथम ही आग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर ही आग वाढत गेली असून तिसऱ्या ते चौथ्या मजल्यापर्यंत आग पसरली आहे. या इमारतीमध्ये तीन जण अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे.

कोरोनाविरुद्धच्या लसीला धोका नाही

पुण्याच्या मांजरी परिसरात ही आग लागली असून दुसऱ्या मजल्यावरुन धुराचे लोट दिसत आहेत. ज्या ठिकाणी ही आग लागली आहे ती आग बीसीजी लसीचे उत्पादन सुरु असलेल्या इमारतीला लागली आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या कोविशिल्ड लसीचे उत्पादन सुरु असलेले ठिकाण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा – सीरम इन्स्टिट्यूटला आग, पण ‘कोविशिल्ड’चं काय?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -