घरठाणेनवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग यार्डला भीषण आग

नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग यार्डला भीषण आग

Subscribe

नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग यार्डेला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सायंकाळच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली असता अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisement -

नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे विभागातील परिसरात असणाऱ्या झोपडपट्टी भागातील डम्पिंग ग्राउंडला संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भीषण लागली. पालिकेच्या वाशी, कोपरखैरणे, ऐरोली विभागातील अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

तुर्भेतील डम्पिंग ग्राउंडला आग लागण्याच्या घटना मागील काही वर्षात वाढल्या आहेत. सदरच्या परिसरात ठाणे बेलापूर मार्गावरून डम्पिंग ग्राउंडकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर झोपड्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे आगीची भयावह घटना घडल्यास अग्निशामक दलाच्या जवानांना घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोठे शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत.

- Advertisement -

आज संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास डम्पिंग ग्राउंडच्या सुक्या कचऱ्याने पेट घेतला. या सुख्या कचऱ्या बरोबरच इतर असणारा कचरा देखील काही क्षणातच आगेच्या ज्वालांनी वेढला गेला. सदर घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशामक दलाच्या जवानांना दिल्यानंतर पालिकेच्या तिन्ही विभागातील अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश येईल, असे अग्निशामक दलाच्या वतीने सांगण्यात आले.

डम्पिंग हटवण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

तुर्भेतील डम्पिंग भूमीवर महापालिकेने पहिला कचऱ्याच्या विल्हेवाट करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने प्रकल्प उभारला होता. सदर प्रकल्प पूर्णपणे वापरल्यानंतर पालिकेने पुन्हा या ठिकाणी उर्वरित जमिनीवर दुसरा डंपिंग प्रकल्प उभारण्यासाठी नियोजन केले आहे. मात्र या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांसह स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश कुलकर्णी यांनी विरोध केला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने शहराबाहेर हा प्रकल्प उभारण्याची मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देखील देण्यात आले आहे. मागील आठवड्यात झालेल्या हळदीकुंकू समारंभाच्या कार्यक्रमात सदर प्रकल्प हटवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. तर डम्पिंगच्या मुद्द्यावरून स्थानिक पातळीवर राजकीय रंग चढला आहे.


हेही वाचा : मुंबईत नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या टोळीवर एनसीबीची मोठी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -