मुंबईतल्या मस्जिद बंदरमधील दुकानांना भीषण आग

मुंबईतल्या मस्जिद बंदरमधील दुकानांना भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. जामा मशिदीजवळील अब्दुल रहमान स्ट्रीटजवळ दुकानांना आग लागली आहे. यामध्ये जवळपास 7 ते 8 दुकानांना आग लागली आहे. तसेच या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली असता अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही सर्व दुकानं ग्राउंड प्लस वनची आहेत. तसेच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. परंतु या घटनेमागील कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये. तसेच सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाहीये.

नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील एमआयडीसी येथे एका पेपर कंपनीला दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग आटोक्यात येते न येते तोच मस्जिद बंदर परिसरात भीषण आगीची घटना घडली आहे. त्याचप्रमाणे  अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.


हेही वाचा : नवी मुंबईतील पेपर कंपनीला आग; दोघे जवान जखमी, गॅस सिलेंडरचा स्फोट