नवी मुंबईतील केमिकल कंपनीला भीषण आग, अग्निमशन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

नवी मुंबईतील केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोदी केमी फार्मा लिमिटेड प्लॉट क्र. 103 नवीन केमिकल झोन तळोजा एमआयडीसी कंपनीला मोठी आग लागली आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. मात्र, यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये. परंतु ही आग कशामुळे लागली हे याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

आग मोठ्या प्रमाणावर पसरली असून आणखी काही कंपन्या बाजूला असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार कारखान्यात रसायनांनी भरलेले ड्रम असल्यामुळे आगीची झळ बसल्याने कारखान्यातून लहान मोठ्या स्पोटांचे आवाज येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आज संध्याकाळपासूनच परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून देखील आग नियंत्रणात येत नसल्याने कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.


हेही वाचा : शहाड रेल्वे स्थानकानजीक मालगाडीचे कपलिंग तुटले, भर पावसात प्रवाशांचा