Pune Fire : पुण्यातील गोदामात अग्नितांडव, तिघांचा होरपळून मृत्यू

पुण्यातील वाघोली येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अग्नितांडवाने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. एका गोदामाला लागलेल्या आगीने रौद्र रूप घेतल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Fire broke out in a godown in Pune, three died

पुण्यातील वाघोली येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अग्नितांडवाने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. एका गोदामाला लागलेल्या आगीने रौद्र रूप घेतल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Fire broke out in a godown in Pune, three died) तर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे वाघोली परिसरातील ज्या गोदामाला ही आग लागली त्याच्या शेजारी 400 भरलेल्या सिलेंडरचे देखील गोडाऊन होते. परंतु, अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे या ठिकाणी मोठी घटना घडण्यापासून वाचली, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – सांगलीतील जतमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथे असलेल्या वाघोली परिसरातील उबाळे नगरमध्ये असलेल्या गोदामाला आग लागली. शुभ सजावट मंडप या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोदामात आग लागली होती. या आगीमध्ये चार सिलेंडरचा स्फोट झाला. पण अग्निशमन दलाला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम सुरू केले. तर यावेळी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 तर पीएमआरडीएच्या 4 गाड्या दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. पण ही आग विझविल्यानंतर अग्निशमन दलाने तिघांचे मृतदेह बाहेर काढले. हे तिघेही या गोडाऊनमध्ये काम करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर अद्यापही या आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही.

मोठा दुर्घटना टळली
धक्कादायक बाब म्हणजे वाघोली परिसरातील ज्या गोदामाला ही आग लागली त्याच्या शेजारी 400 भरलेल्या सिलेंडरचे देखील गोडाऊन होते. याबाबत माहिती देताना पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आपत्कालीन परिस्थितीत जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी चांगले काम केले. जवळच 400 सिलिंडरचा साठा असलेले गोदाम होते. त्या ठिकाणी आग पसरू नये म्हणून खबरदारी घेतली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.”

गेल्या काही दिवसांत पुण्यात आणि राज्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. पुण्यात ही आगीची घटना घडल्यानंतर काही तासांतच दुसरी आगीची घटना घडल्याची माहिती समोर आली. दुसऱ्या घटनेत पिंपरी येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. रात्री दोन वाजता ही घटना घडली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे दोन तास लागले. या आगीत 10 लाखांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तसेच या आगीत बॅंकेतील कागदपत्र जळून खाक झालेले आहेत. या आगीचे कारणं समोर आले नसून यात बॅंकेचे मोठे नुकसान झाल्याची आणि आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.