बोईसर इंडस्ट्रियल युनिटमधील केमिकल कंपनीला भीषण आग

पालघर जिल्ह्यातील (Palghar District) बोईसरमध्ये असलेल्या इंडस्ट्रियल युनिटमध्ये केमीकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली. बोईसर इंडस्ट्रियल युनिटमधील राजकॉब इंडस्ट्रीज या केमिकल कंपनीला आग लागली आहे.

पालघर जिल्ह्यातील (Palghar District) बोईसरमध्ये असलेल्या इंडस्ट्रियल युनिटमध्ये केमीकल कंपनीत (boisar industrial unit chemical company) भीषण आग लागल्याची घटना घडली. बोईसर इंडस्ट्रियल युनिटमधील राजकॉब इंडस्ट्रीज या केमिकल कंपनीला आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. (fire in boisar industrial unit chemical company)

अग्निशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न

बुधवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली. बोईसर (boisar) इंडस्ट्रियल युनिटमधील प्लॉट नंबर ४१ वर असलेल्या राजकॉब इंडस्ट्रीज या केमिकल कंपनीमध्ये ही भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट

घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या ६ हून अधिक गाड्या दाखल झाल्या आहेत. मात्र, या आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. शिवाय, अग्निशमन दलाच्या जवानांकडून या कंपनीमध्ये कर्मचारी अडकला आहे, का याची चौकशी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजकॉब इंडस्ट्रीज या केमिकल कंपनीमध्ये केमिकलचे काम सुरू असताना ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. परंतु, ही आग नेमकी कशी लागली याचा तपास अग्नीशमन दल करत आहे.

दरम्यान, पालघर जिल्ह्यात असलेल्या या बोईसर औद्योगिक वसाहतीत अनेकदा आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.


हेही वाचा – मलिक-देशमुखांच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली, विधान परिषद मतदानासाठी दोन्ही नेत्यांचा अर्ज