पुण्याच्या शनिवार पेठेतील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. प्रभात टॉकिजसमोर ही इमारत आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या आगीत १० जण अडकले आहेत. दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाचे जवान युद्ध पातळीवर आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, धूर जास्त असल्यामुळे बचावकार्यात अडथळा येत आहेत. या आगीत अडकलेल्या चार जवाना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात जवानांना यश आले आहे. मात्र, इमारतीच्या टॅरेसवर अध्यापही १० जण अडकली आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.