घरमहाराष्ट्रपरळमधील महानगरच्या गॅसवाहिनीमधून वायूगळती, अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात

परळमधील महानगरच्या गॅसवाहिनीमधून वायूगळती, अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात

Subscribe

मुंबई – परळमध्ये पेट्रोल पंपानजिक जमिनीतून अचनाक भडका उडाला होता.महानगर पालिकेची गॅसवाहिनीतून वायूगळती झाल्याने आग लागली होती. दरम्यान, ही आग आता अटोक्यात आली असल्याचं स्पष्ट झालं आहे.

परळ येथील मुख्य चौक परिसरातील एका पेट्रोल पंपानजिक असलेल्या जमिनीतून पालिकेची गॅस वाहिनी गेली आहे. ती फुटल्याने ही आग लागली होती. आग लागताच पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश न आल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडा दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू असून आग नियंत्रणात आली आहे. दरम्यान, परिसरात आगीमुळे धुरांचे लोट निर्माण झाले होते. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून आजूबाजूची दुकानं बंद करण्यात आली. तसेच, वीजपुरवठा खंडीत करण्यात आला.

- Advertisement -

दरम्यान, आगीची माहिती मिळताच, परिसरातील लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले आहेत. नगरसेविका उर्मिला पांचाळ आणि आमदार अजय चौधरी यांनी घटनेची पाहणी केली. सुरुवातीला आग विझवण्यासाठी पाण्याचा फवारा केला. मात्र फवारा मारताना आग विझण्यास अनेक अडथळे आले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -