घरताज्या घडामोडीपुण्यात धक्कादायक प्रकार, ठाकरे गटाच्या कार्यालयावर गोळीबार

पुण्यात धक्कादायक प्रकार, ठाकरे गटाच्या कार्यालयावर गोळीबार

Subscribe

पुण्यात दिवसागणिक गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु राज्यातील राजकीय परिस्थिती पाहिली असता ठाकरे गटावरील संकट काही कमी होताना दिसत नाहीये. आज पुण्यात उद्धव ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना वानवडी परिसरात घडली. शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर एका टोळक्याने गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणण्याऱ्याने हातात पिस्तुल घेऊन हवेत गोळीबार केला. आरोपीने रस्त्यावर येऊन आणि हातात पिस्तुल घेऊन ‘यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे, तो जान से हात धो बैठोगे,’ असे म्हणत पिस्तुलातून फायरिंग करुन दहशत निर्माण केली. अतिक शेख, सादिक शेख, हुसेन कादिरी अशी आरोपींची नावे आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ इम्रान आणि सादीक शेखचा भाऊ शब्बीर कादरी यांच्यात २७ डिसेंबरला भांडणं झाली होती. त्याचा राग मनात धरुन अतिक व इतर दुचाकीवरुन सय्यदनगर येथील गल्ली नं २२ मधील कार्यालयात आले़. कार्यालयात कुणीही नसताना त्यावर लाथा मारण्यात आल्या आणि गोळीबार करत दहशत निर्माण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संदिप जनशिवले पुढील तपास करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : कर्नाटकडून महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी पळवण्याच्या प्रयत्नात, अजित पवारांचा आरोप


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -