खंडाळ्यात मराठा महासंघ युवक उपाध्यक्षांच्या गाडीवर गोळीबार

अखिल भारतीय मराठा महासंघ युवकचे उपाध्यक्ष प्रसाद प्रदिप कोंडे यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. खंडाळा तालुक्यातील मोर्वे-वाघोशी रस्त्यावरील वाघोशी खिंडीलगत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी कोंडे यांच्या गाडीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. परंतु कोंडेंच्या सुरक्षा रक्षकांकडून संरक्षणार्थ हवेत गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपासणीला सुरूवात केली आहे. या घटनेमागील नेमकं कारण काय?, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोर्वे वाघोशी रोडवरील खिंड उतरताना हा प्रकार घडाला. प्रसाद कोंडे हे पुणे जिल्हयातील वीर येथील नाथमंदीर आणि मोर्वे येथील दत्तमंदीराचे दर्शन घेऊन मोर्वे वाघोशी रस्त्यावरून लोणंदकडे आपल्या कारमधून जात होते.

त्याचवेळी मोटारसायकल वरून पाठिमागुन येणाऱ्या दोन अज्ञातांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्याला प्रतित्युर म्हणून कोंडे यांच्या सुरक्षारक्षकानेही गोळीबार केला. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र कारवर दोन गोळ्या झाडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.


हेही वाचा : आम्हाला पोलीस व्हॅनसमोर उभे करा आणि.., राहुल गांधींविरोधात मनसेचं प्रीप्लॅन