घरताज्या घडामोडीअहमदनगर : वैयक्तीक वादातून महिलेवर गोळीबार; महिलेचा मृत्यू

अहमदनगर : वैयक्तीक वादातून महिलेवर गोळीबार; महिलेचा मृत्यू

Subscribe

पारनेर तालुक्यातील वडझिरे गावात महिलेवर गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारात महिलेचा मृत्यू झाला आहे.

नगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये वडझिरे येथे दोघा अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सविता सुनील गायकवाड (३५) असे या गोळीबारात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेने जिल्हा हादरला असून वैयक्तीक वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.

नेमके काय घडले?

पारनेर-अळकुटी मार्गावरील वडझिरे येथे सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या हा प्रकार घडला आहे. घटनास्थळी आलेल्या दोघा तरुणांनी सविता गायकवाड यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि संतप्त झालेल्या एका तरुणाने स्वत:कडील गावठी पिस्तुल काढत गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. गायकवाड यांच्या मानेवर, हाताच्या पंज्याला आणि कानाजवळ गोळी लागल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. महिलेच्या मुलीने आरडाओरड केल्यानंतर गावकरी घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच गायकवाड यांचा मृत्यू झाला. परंतु, गोळीबाराचे नेमके कारण समजू शकले नसले तरी वैयक्तीक वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान, या घटनेनंतर वडझिरे गावात तणाव निर्माण झाल्याने गावामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई एअरपोर्ट गुगल अर्थच्या सर्वाधिक आकर्षक स्थळांच्या यादीत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -