घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये भरदिवसा तरुणावर गोळीबार; चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नाशिकमध्ये भरदिवसा तरुणावर गोळीबार; चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

भरदिवसा टोळक्याकडून एका तरुणावर गोळीबार केल्याने नाशिक शहर हादरलं पूर्णपणे हादरलं आहे.

नाशिक येथे रविवारी भरदिवसा एका तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किरण भंडगे असे या तरुणाचे नाव असून मखमलाबाद परिसरात त्याच्यावर हल्ला करण्यात आला. किरणवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे नाशिक शहर चांगलेच हादरले आहे.

रविवारी नाशिक शहरात पोलिसांचा मसरेथॉन इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. इव्हेंट पार पाडून काही तास उलटत नाहीत तोवर किरणवर एका टोळक्याने गोळीबार केला. किरणवरील या प्राणघातक हल्ल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. हल्ला पूर्वमैनस्यातून करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘चिकनमुळे करोना होतो’ ही अफवा थांबविण्यासाठी सरकारची अनोखी शक्कल


दरम्यान, जखमी किरणने काहींची नावं पोलिसांना सांगितली आहेत. या महितीवरून चार संशयितांविरोधात नाशिकच्या म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकने यांनी दिली आहे. भरदिवसा तरुणावर झालेल्या या हल्ल्याने नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -