घरमहाराष्ट्रFiring : मुंबईतील गोळीबार प्रकरणाने काँग्रेसचे संयमी नेते झाले संतप्त: बाळासाहेब थोरात...

Firing : मुंबईतील गोळीबार प्रकरणाने काँग्रेसचे संयमी नेते झाले संतप्त: बाळासाहेब थोरात म्हणाले…

Subscribe

अहमदनगर : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. आरोपी मॉरीस याने अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या कार्यालयात बोलावलं. तिथे त्यांच्यासोबत फेसबुक लाइव्ह केलं. यावेळी दोघांनीही आपल्यातील वाद मिटल्याचं सांगितलं, पण त्यानंतर अचानक मॉरीसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या, यात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर विरोधक राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आता संयमी असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त करताना राज्य सरकारव टीकास्त्र सोडले आहेत. (Firing Moderate Congress leaders angry over Mumbai firing incident Balasaheb Thorat)

हेही वाचा – SEBI : टीव्हीवर शेअर खरेदी-विक्रीची माहिती देणं पडलं महागात; सेबीने ठोठवला कोट्यवधींचा दंड

- Advertisement -

राहुरीतील वकील पती-पत्नीच्या हत्येच्या निषेधार्थ आणि वकिलांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी नगर जिल्ह्यातील वकिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चानिमित्त बाळासाहेब थोरात नगरला आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांना गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोळीबाराच्या घटनांप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, मुंबईत भाजपाच्या आमदारांनी आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यावर गोळीबार केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. खरे तर त्यात काय तथ्य आहे, हे जनतेला कळले पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे. जर एखाद्याचा नेत्यासोबत फोटो येत असेल आरोप होतच राहणार आहेत. पण मुख्यमंत्र्यांना अनेक लोक भेटतात, त्यांना प्रत्येकांना तपासणे शक्य नसते. पण जवळचा गुन्हेगार असेल त्यांनी गांभीर्याने घेतले पाहिजे, असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला.

हेही वाचा – Politics : इंडिया आघाडीला गळती; ‘भारतरत्न’देऊन भाजपाने आणखी एक विकेट काढली?

- Advertisement -

राज्यात गुन्हेगारांवर कोणाचाच धाक राहिला नाही, असा आरोप करत बाळासाहेब थोरात म्हणाले की, जनता भयभीत झाली आहे. ईडी, पोलीस, सीबीआय यासारख्या स्वायत्त संस्थाचा वापर करून विरोधकांना अडचणी आणले जात आहे. चूक असेल तर चूक म्हटले पाहिजे, मात्र एकतर्फी गुंतवण्याचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे. दुसरीकडे कारवाई झालेले तिकडे गेले की, त्यांच्यावरील आरोपाची फाईल सापडत नाही, याला काय म्हणायचे? असा सवाल उपस्थित करत आता जनताच न्याय करेल आणि काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -