घरमहाराष्ट्रमुंबई - बंगळुरु महामार्गावर तरूणावर गोळीबार

मुंबई – बंगळुरु महामार्गावर तरूणावर गोळीबार

Subscribe

मुंबई - बंगळुरु महामार्गावर तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत हरिओम सिंग व्यक्ती जखमी झाले असून वाकड पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

मुंबई – बंगळुरु महामार्गावर तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबई – बंगळुरु महामार्गावरील वाकड येथील हॉटेल कोल्हापुरी येथे सिगारेट घेण्यासाठी उतरलेल्या तरुणावर अचानक गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत हरिओम सिंग (३०) जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेचे मारेकरी फरार असून वाकड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नेमके काय घडले?

राजस्थान येथे राहणारे हरिओम सिंग मुंबई – बंगळुरु महामार्गावरील वाकड येथील हॉटेल कोल्हापुरी येथे सिगारेट घेण्यासाठी शविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास उतरले. त्या दरम्यान त्यांचा पाठलाग करणारे तिघे जण त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. हरिओम यांनी त्या मारेकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आणि सिगरेट घेऊन पुन्हा गाडीत बसले. ते गाडीत बसल्याने पाहुन त्यांनी हरिओम यांची गाडी थांबवून त्यांच्या पोटाला पिस्तूल लावत गाडी पुढे घेण्यास सांगितली. त्यावेळी हरिओम यांनी काय झाले अशी विचारणा केली? त्यानंतर त्या तिघांपैकी एकाने तुला मारायचे आहे असे म्हटले. घाबरलेल्या हरिओमने हे ऐकल्यानंतर गाडीतून उतरुन हॉटेलच्या दिशेने पळ काढला. मारेकऱ्यांनी गोळी झाडली मात्र त्यात हरिओम थोडक्यात बचावले गेले. परंतु या घटनेत ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस मारेकऱ्यांचा कसून शोध घेत आहेत.

- Advertisement -

वाचा –  पुणे रेल्वे स्टेशनवर वरिष्ठ पोलीस निरिक्षकावर गोळीबार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -