घरक्राइमक्रिकेटवरुन दोन गटात हाणामारी, मध्यस्थी केली म्हणून उपमहापौरांवर गोळीबार

क्रिकेटवरुन दोन गटात हाणामारी, मध्यस्थी केली म्हणून उपमहापौरांवर गोळीबार

Subscribe

क्रिकेटवरुन दोन गटात सुरु असलेला वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी केली म्हणून जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार करण्यात आला. दरम्यान, या हल्ल्यातून कुलभूषण पाटील थोडक्यात बचावले. ही घटना कुलभूषण पाटील यांच्या राहत्या घराजवळ म्हणजेच, पिंपराला येथील मयूर कॉलनी परिसरात घडली. या घटनेने परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

जळगावमधील खोटेनगर परिसरात असलेल्या मैदानावर रविवारी दुपारी नितीन राजपूत आणि महेंद्र राजपूत या दोघांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून जोरदार वाद उफाळून आला. दरम्यान, हा वाद सोडवण्यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील त्या ठिकाणी गेले आणि वाद मिटवला. मात्र, त्यानंतर दोन तासांनी एका इनोव्हातून चार जण आले आणि त्यांनी रस्त्यावरच कुलभूषण पाटील यांना अडवलं आणि भांडणात मध्यस्थी का केली? अशी विचारणा करत हटकलं. शिवाय, त्यांना मारहाण देखील करायला सुरुवात केली. त्याच दरम्यान गाडीतील एकानं सोबत आणलेल्या बंदुकीतून कुलभूषण यांच्यावर गोळीबार केला. मात्र नेम चुकल्याने ते बचावले. यावेळी कुलभूषण यांनी आपल्या राहत्या घराच्या मागे पळ काढून आपला बचाव केला. गाडीतून आलेल्या तिघांनी ते घरात घुसले असतील अशी शक्यता पाहता त्यांच्या घरावरही तीन राउंड फायर करून पलायन केलं, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, गोळीबार करणारे हे सर्वजण उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या परिचयाचे असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात जळगाव शहरातील रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजपूत गटात झालेल्या वादात मध्यस्थी केल्यामुळे हा हल्ला झाल्याची पोलीस सूत्रांची प्राथमिक माहिती आहे. या घटनेच्या संदर्भात अद्याप कोणालाही अटक अथवा ताब्यात घेण्यात आलेलं नसलं तरी संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -