१७ खोट्या कंपन्यांच्या ४३६ कोटी रुपयांच्या बनावट पावत्या, कर परतावा घेताना झाली अटक

करचुकवेगिरी करताना दिल्ली पोलिसांनी एक मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे

GST arrest
कर चुकवणाऱ्याला परतावा घेताना दिल्लीत अटक

वस्तू व सेवा कराच्या पूर्व दिल्ली आयुक्तालयाने आणि करचुकवेगिरी प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी मिळून बनावट पावत्या बनवून इनपूट टॅक्स क्रेडिट घेताना तीन जणांना दिल्लीत अटक केली आहे. हा गैरव्यवहार सुमारे 436 कोटी रुपयांचा असून त्यावर सुमारे 11 कोटी 55 लाख रुपयांचा कर परतावा मिळवण्याचा त्या तिघांचा प्रयत्न होता. यासाठी काही बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने हवाला व्यवहार चालवले जात होते. पण बनावट पावत्यांचा परतावा घेताना त्यांचे हे बिंग फुटले. परतावा घेताना दिल्ली पोलिसांनी लावलेल्या यशस्वी सापळ्यामुळे आरोपींच्या मुसक्या आवळने शक्य झाले. या त्रिकुटाने एकुण १७ कंपन्या तयार केल्याचे फक्त कागदोपत्रीच दाखवले होते. कंपनीचे व्यवहार, देवाण घेवाण करणारे सगळेच खोटे निघाल्याचे आढळले आहे.

वस्तू व सेवा कराच्या पूर्व दिल्ली आयुक्तालयाने या मोठ्या कामगिरीमुळे एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या संपुर्ण प्रकरणात काही बॅंक अधिकाऱ्यांनीही मदत केली असल्याने आता या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. आतापर्यंत अवघ्या तीघांना अटक करण्यात आली आहे. पण आगामी काळात मात्र आणखी काही जणांवर या प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे. करचुकवे करून हुबेहुब पावत्या तयार करण्यासाठी या प्रकारावर काही दिवसांपासून लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. आयत्यावेळी झालेल्या अटकेमुळे या तिनही मालकांची धांदल उडाली. आगामी कालावधीत या प्रकरणात काही बॅंकेतील अधिकारीही रडावर असणार आहेत असे कळते. आणखी काही राज्यांमध्येही या त्रिकुटाने आपले पाय पसरवण्याचा निर्णय़ घेतला होता. पण त्याआधीच हे बिंग फुटले.

करचुकवेगिरी करून बनावट पावत्या तयार करणाऱ्या आरोपींची नावे आसिफ खान, राजीव छटवाल आणि अर्जुन शर्मा अशी असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमधील काही जण हे एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने त्यांना 13 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.