घरमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर पहिला अपघात; जखमी नाही आणि पोलिसांत तक्रारही नाही

समृद्धी महामार्गावर पहिला अपघात; जखमी नाही आणि पोलिसांत तक्रारही नाही

Subscribe

समृद्धी महामार्गाचा प्रवेशद्वार असलेल्या वायफळ टोलनाक्याजवळ हा अपघात झाला. टोलनाका जवळ आला म्हणून एका गाडीने वेग कमी केला. तेवढ्यात मागून एक कार वेगाने आली व त्या गाडीवर धडकली. टोलनाक्यावर असलेले कर्मचारी तत्काळ अपघात झालेल्या वाहनांजवळ गेले. दोन्ही वाहनांतील प्रवाशांपैकी कोणीही जखमी झाले नाही. वाहनांचे नुकसान झाले.

नागपूर : समृद्धी महामार्गावर सोमवारी पहिला अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. पोलिसांतही याची तक्रार दाखल झाली नाही.

समृद्धी महामार्गाचा प्रवेशद्वार असलेल्या वायफळ टोलनाक्याजवळ हा अपघात झाला. टोलनाका जवळ आला म्हणून एका गाडीने वेग कमी केला. तेवढ्यात मागून एक कार वेगाने आली व त्या गाडीवर धडकली. टोलनाक्यावर असलेले कर्मचारी तत्काळ अपघात झालेल्या वाहनांजवळ गेले. दोन्ही वाहनांतील प्रवाशांपैकी कोणीही जखमी झाले नाही. वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांत याची तक्रार करण्याचा सल्ला नुकसान झालेल्या गाडीच्या चालकाला टोलनाका कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला. दोन्ही वाहन चालकांनी सामोपचाराने यावर तोडगा काढल्याने पोलिसांत याची तक्रार झाली नाही. पोलिसांनी स्टेशन डायरीत अपघाताची नोंद करुन घेतली आहे.

- Advertisement -

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले. नागपूर ते मुंबई रस्तेमार्गे प्रवास १६ तासांवरुन ८ तासांवर आणणारा हा महामार्ग आहे. या महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. या उद्घाटनाला उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नव्हते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. प्रोटोकाॅलनुसार विरोधी पक्षनेत्याला सरकारी कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. मी विरोधी पक्षनेता असताना मलाही अनेक कार्यक्रमांना निमंत्रण दिले गेले नाही, असे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कर्नाटक सीमा वादावरुन सध्या घमासान सुरु आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक सीमा वादावर बोलावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले होते. पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटक सीमा वादावर भाष्य केले नाही. दरम्यान कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ थोपटली. त्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची पाठ थोपटली, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -