घरअर्थसंकल्प २०२२Maharashtra Assembly Budget Session 2022 : विधान परिषदेचा पहिला दिवस गोंधळाचा, नवाब...

Maharashtra Assembly Budget Session 2022 : विधान परिषदेचा पहिला दिवस गोंधळाचा, नवाब मलिकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Subscribe

विधान परिषदेचे पहिल्या दिवसाचे कामकाज गाजले ते राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याने. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांचा राजीनाम्याची मागणी विरोधतींनी जोरदारपणे लावून धरली. नवाब मलिक यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी विरोधकांनी केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात भाजपच्या आमदारांनी वेळेमध्ये येऊन घोषणाबाजी केली.

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, हसीना पारकर याच्याशी संबंध असल्याचे सांगत आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. नवाब मलिक यांचा राजीनामा न घेणारे असे दाऊदशी संबंधित सरकार असल्याची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. राजीनाम्याचा मागणीवर विरोधी पक्षाने सभात्याग केला.

- Advertisement -

विरोधकांच्या गोंधळातच २०२१-२२ च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. नगरविकास विभागाचे अध्यादेश यावेळी पटलावर ठेवण्यात आले. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक २०२१ बाबत राज्यपालांचा संदेश कामकाजात घेण्यात आला. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामासाठी तालिका अध्यक्षांची घोषणा यावेळी करण्यात आली

कामकाजाच्या शेवटच्या टप्प्यात शोक प्रस्ताव मांडण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, उद्योगपती राहुल बजाज, विधान परिषदेचे सदस्य रामनिवास सिंह, सर्वश्री नारायण ज्ञानदेव पाटील, सुधीर जोशी, माजी मंत्री दत्तात्रय लंके, माजी विधान परिषद सदस्य संजीवनी रायकर, आशाताई टाळे, कुमुद रांगणेकर यांच्या दुःखद निधनाबाबत शोक प्रस्ताव मांडण्यात आला. शोक प्रस्ताव मांडल्यानंतर परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra Assembly Budget Session 2022 : ओबीसी आरक्षणासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी आम्ही तयार – आशिष शेलार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -