घरताज्या घडामोडी'शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार'

‘शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार’

Subscribe

“महाविकास आघाडी सरकारतर्फे कर्जमाफिला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची पहिली यादी आम्ही सोमवारी जाहीर करणार आहोत”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पहिल्या यादीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील २ गावांचा समावेश असून, २० हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी ही शेतकऱ्यांना खुश खबर दिली. तसेच ३५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची माहिती आली असून, आम्ही फक्त घोषणा नाही तर काम केलीत, असा टोला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. तसेच कर्जमुक्तीची यादी आम्ही पुढे पुढे घेत जाऊन ही योजना ३ महिन्यात पूर्ण करू, असे सांगत मागील काळातली कर्जमाफी आतापर्यंत चालू असल्याची टीका देखील मुख्यमंत्र्यांनी केली.

गिरणी कामगारांनाही खुशखबर

दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांनाही खुशखबर दिली आहे. गिरणी कामगारांना १ मार्च रोजी लॉटरीद्वारे घरे वितरीत करण्याची योजना राबवली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. गिरणी कामगारांच्या संघटनेची आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

हे दिवस मोजणारे सरकार नाही

दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चिमटा काढत सरकारला किती दिवस झाले हे सांगत आम्ही दिवस मोजणारे सरकार नसल्याची टीका विरोधकांवर केली. तसेच विरोधी पक्षाच्या सर्वच प्रश्नांना उत्तर द्यावे, असे मला वाटत नसल्याचे सांगत विरोधी पक्षाने फक्त विरोधाची भूमिका घेऊ नये. तसेच विरोधी पक्ष आहोत म्हणून सरकारवर वारेमाप आरोप देखील करणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच हे सरकार स्थिरावलेल असून, हे सरकार काम करत आहे आणि त्यामुळे हे विरोधी पक्षाला पचणी पडत नसल्याची टीका देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

दरम्यान गरीब मुलांसाठी मोफत चष्मे आम्ही वाटले आहेत. पण विरोधी पक्षाला चष्म्याची गरज असेल तर आम्ही त्यांना मोफत चष्मे देऊ, अशी खोचक टीका देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच एल्गार परिषदेचा तपास मी एनआयएला मी दिलेला नाही हा तपास केंद्राने त्यांच्याकडे घेतल्याचे सांगत हा तपास केंद्राने त्यांच्याकडे घेतला याबद्दल आमची नाराजी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. राज्यातल्या तपास यंत्रणेबाबत अविश्वास दाखवण्यासारख होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करत नेहमी प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना चहापाण्यासाठी बोलवले होते. पण दोन्ही सभागृहाच्या विरोधीपक्षनेत्यांनी यावर बहिष्कार टाकल्याचे सांगत ३०६ केंद्र तूर खरेदीसाठी आम्ही उघडली असून, ३ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाल्याचे अजित पवार म्हणालेत. तसेच विरोधी पक्ष लोकांमध्ये गैरसमज निर्माण करत असल्याचे सांगत राज्यपालांनी थेट सरपंच पदाच्या विषयी आक्षेप घेतला नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच त्यांनी सांगितले आहे की तुम्ही अधिवेशनात बिल आणा त्यानुसार आम्ही अधिवेशनात याबाबत बिल आणणार असल्याचे अजित पवार यावेळी म्हणालेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -