एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

eknath shinde to arrive in mumbai on special flight to meet governor shocks thackeray govt

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी कथितप्रकारे बंड केलं आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर ते आपल्यासोबत जवळपास ३५ आमदारांना घेऊन गुजरातमध्ये गेले आहेत. गुजरातमध्ये दाखल झाल्यावर एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी बोलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु काल दिवसभर एकनाथ शिंदे काही बोलले नाही. मात्र आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (First photo of eknath shinde and other mla after revolt)

एक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांचा फोटो समोर आला आहे. सुरतच्या हॉटेलमधील हा फोटो आहे. या फोटोमध्ये एकूण ३२ आमदार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांचाही समावेश आहे. बच्चू कडू हे एकनाथ शिंदेंच्या बाजूला पहिल्याच रांगेत दिसत आहेत.

प्रथम दर्शनी फोटोत दिसत असलेले आमदार

1.प्रताप सरनाईक
2. श्रीनिवास बनगा
3.अनिल बाबर
4.नितिन देशमुख
5.लता सोनवाने
6.यामिनी जाधव
7.संजय सिरसाट
8.महेंद्र दलवी
9.भारत गोगवले
10.प्रकाश सर्वे
11.सुहास कांदे
12. बच्चू कडु , प्रहार पार्टी
13- नरेन्द्र बोंडेकर , निर्दलीय अमरावती
14- संजय गायकवाड़
15- संजय रायमूलकर
16-बालाजी कल्याणकर
17- रमेश बोरनारे
18- चिमणराव पाटील
19- किशोर पाटील
20-नितीनकुमार तळे
21-संदीपान बुमरे
22-महेंद्र थोरवे

या फोटोमुळे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे चेहरे समोर आले आहेत. त्यामुळे आता शिववसेना यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या सर्व बंडखोर आमदारांना मध्यरात्री आसामला नेले जाणार असून यानंतर शिवसेना सत्ता टिकवणार की एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सत्तेचा सस्पेन्स वाढत असून सुरतेतील आमदारांना आसाममधील गुवाहटीला नेले जात आहे.

त्याशिवाय, अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या तपासासाठी अकोल्यातील शिवसेनेचे पदाधिकारी सुरतेत दाखल झाले आहेत. त्यांचा अजूनही देशमुखांशी संपर्क झाला नाही. त्यामुळे आता सर्वांची धाकधूक वाढली असून गुजरात पोलिसही आम्हाला साथ देत नसल्याचं शिवसेना पदाधिकांऱ्यांनी सांगितलं आहे.