शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच शरद पवार लेकीसोबत मुंबई सफरीला

सुरुवातीला मुंबईत सामान्य माणुस होता परंतु आता सगळं चित्र बदलले आहे. असे मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केले आहे.

first time after the surgery, Sharad Pawar car ride to Mumbai with supriya sule
शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच शरद पवार लेकीसोबत मुंबई सफरीला

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी रितसर परवानगी काढूनच घराबाहेर पडले होते. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गेल्या २ महिन्यात ३ वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शरद पवार घरीच विश्रांती करत होते परंतु आज थोडा विरंगुळा म्हणून शरद पवार आणि सुप्रिया सुळे घाराबाहेर मोकळ्या वातावरणात मुंबई सफरीला बाहेर पडले आहेत.

राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई सफर करताना आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन लाईव्ह प्रसारण केले होते. यामध्ये त्यांनी आपण रितसर परवानगी घेऊन शरद पवारांसोबत मुंबई सफरसाठी निघालो असल्याचे सांगितले आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच लेकीसोबत मुंबई सफरीला बाहेर पडले आहेत. मुंबई सफर करताना सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटले आहे की, रितसर परवानगी काढलेली आहे. लॉकडाऊन आहे, जबाबरदारी आहे याची जाणीवह आहे. परंतु शरद पवार यांच्यासोबत मुंबई सफरसाठी घराबाहेर पडलो आहे. यावेळी सुप्रिया सुळेंनी आपण १९७१ साली मुंबईला आलो असल्याचे सांगितले तर शरद पवार काँग्रेस सेक्रेटरी असताना १९६२ -६३ साली आलो असल्याचे सांगितले. दादरमधील खेड गल्लीत काँग्रेसचे कार्यालय होते. तेथील टिळक भवनात १९६३ मध्ये राहायचो असे शरद पवार यांनी सांगितले. त्यावेळी जवळपास ५ वर्षे टिळकभवनात राहिलो होतो. काँग्रेसचे कार्यकर्ते भेटण्यासाठी यायचे, काम करण्यासाठी यायचे आणि तेही तिथेच राहत होते. परंतु त्या काळची मुंबई आणि आताची मुंबई यामध्ये फार फरक आहे. विशेषता मुंबईचा भाग हा कष्टकरी आणि सामान्य लोकांचा भाग होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात कोकणी, घाटावरचे लोक राहायला होते. ही सर्व मंडळी एकत्र यायचे सण उत्सव साजरे करायचे, कोकणातील जे जुने सण आहेत ते मुंबईत पाहायला मिळायचे अशी आठवण शरद पवारांनी मुंबई सफर करताना सांगितली आहे.

तसेच पुढे शरद पवारांनी आठवणींना उजाळा देताना म्हटले आहे की, सुरुवातीच्या काळात ते जेव्हा मुंबईत राहायला आले त्यावेळी त्यांना घाटी म्हणून बोलायचे. तेव्हाची मुंबई आणि आताची मुंबई यामध्ये फार फरक आहे. पहिली परंपरा वेगळी होती आणि आताची वेगळी आहे. सुरुवातीला मुंबईत सामान्य माणुस होता परंतु आता सगळं चित्र बदलले आहे. असे मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केले आहे.

गोव्यातील राष्ट्रवादीचे प्रभारी डॉ.हेडेंनी घेतली शरद पवारांंची भेट

गोव्यातील राष्ट्रवादीचे प्रभारी डॉ. हेडेंनी शरद पवार यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यानंतर त्यांच्या तोंडातील अल्सर बळावल्याने त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शरद पवार सध्या घरीच विश्रांती घेत आहेत. शस्त्रक्रिया केल्यानंतर शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गोव्यातील राष्ट्रवादीचे प्रभारी डॉ.हेडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.