घरमहाराष्ट्रमतदानाची हौस आणि सोशल मीडियावर पोस्टचा पाऊस!

मतदानाची हौस आणि सोशल मीडियावर पोस्टचा पाऊस!

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठी आज, चौथ्या टप्प्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान होत असून अनेक व्यक्ती सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत असताना दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी आज, चौथ्या टप्प्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान होत आहे. राज्यातल्या १७ मतदारसंघांमध्ये मतदान होत असून सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात उत्साह पाहिला मिळत असताना दुसरीकडे बरेच नागरिक सोशल मीडियावर देखील आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. अनेक तरुणांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला असून त्यांनी आपल्या भावना ट्विटर अकाऊंटवरुन व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

राज्यातल्या १७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार

राज्यातल्या १७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण,ठाणे, मावळ, शिरूर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि दक्षिण मुंबई अशा १७ मतदार संघांचा समावेश आहे. तर देशभरातल्या एकूण ९ राज्यांतल्या ७२ मतदारसंघांसाठी मतदान होत असून राज्यातला हा चौथा आणि शेवटचा टप्पा असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद राज्यात पणाला लावली होती. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -