घरमहाराष्ट्रमहाडमध्ये पुराचा पहिला बळी; पुराचं पाणी गच्चीवरुन पाहताना गेला तोल

महाडमध्ये पुराचा पहिला बळी; पुराचं पाणी गच्चीवरुन पाहताना गेला तोल

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून लपलेल्या पावसाने राज्यात जोरदार पुनरागमन केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. मुंबईसह उपनगरात सकाळपासून वेगवान वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे. तर राज्यात मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने रायगड जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाड शहरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र महाड शहर पाण्यात असताना या पुराचा पाण्यात पुराचा पहिला बळी गेला आहे. हा बळी गच्चीवरून पुराच्या पाण्याचा अंदाज घेत असताना तोल जाऊन गेल्याचे सांगितले जात आहे.

असा घडला प्रकार

महाड शहरात सावित्री नदीचे पाणी शिरल्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे.त्यातच पुराचे पाणी वाढल्याने ते गच्चीवरुन पाहताना तोल जाऊन एक व्यक्ती पुराच्या पाण्यात पडल्याची माहिती मिळतेय. महाडच्या रोहिदास नगर भागात ही घटना घडली असून इमारतीच्या गच्चीवरुन हा व्यक्ती पुराच्या पाण्याचा अंदाज घेत असताना हा प्रकार घडला आहे. महाडमधील खासगी रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार सुरू होते मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

दरम्यान, कोकणातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं रायगडसह चिपळूण, राजापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणची परिस्थिती खूपच गंभीर बनली आहे. मुसळधार पावसानं चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर येऊन नदीचे पाणी शहरात शिरले आहे. त्यामुळे चिपळूण शहरात साधारण ५ हजार लोक अडकून पडले आहेत. संपूर्ण शहराला पाण्याचा वेढा पडल्याने चिपळुणात मदत पोहोचणेही अशक्य होत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. मात्र चिपळुणासाठी तातडीनं मदत पाठवण्याची मागणी खासदार विनाय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शहरात रस्ते मार्गे मदत पोहोचणं शक्य नसल्यानं कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टर्सची मदत घेऊन नागरिकांची सुटका करण्याची मागणीही विनायक राऊतांनी केली आहे.


मुंबईकरांचे हाल थांबवा, लोकल सुरू करा – राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -