घरCORONA UPDATEलॉकडाऊन : राज्यातील मच्छीमारांना केंद्राकडून दिलासा मिळण्याची शक्यता

लॉकडाऊन : राज्यातील मच्छीमारांना केंद्राकडून दिलासा मिळण्याची शक्यता

Subscribe

लॉकडाऊनचा फटका राज्यातील मच्छीमारांना देखील बसला आहे.

सुशांत सावंत

सध्या कोरोनामुळे देशासह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घेण्यात आल्यामुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. याच लॉकडाऊनचा फटका राज्यातील मच्छीमारांना देखील बसला आहे. लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाण मच्छीमारांना नुकसान झाले असून, त्यांचा आर्थिक प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्यातच आता केंद्राकडून मच्छीमारांना खुशखबर मिळण्याची शक्यता असून, लवकरच मच्छीमारांसाठी विशेष पॅकेज देण्याचे सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी आपलं महानगरला दिली आहे. खुद्द केंद्राने राज्याच्या मत्स्यविभागाला पत्र लिहून झालेल्या नुकसानीची माहिती मागवली असून, केंद्र सरकार एक विशेष पॅकेज देण्याची शक्यता आहे.

- Advertisement -
IMG-20200402-WA0194
लॉकडाऊन मुळे झालेली
नुकसान भर द्या

राज्यसरकारच्या पाठपुराव्याला यश मिळणार 

दरम्यान राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी लॉकडाऊनमुळे अन्य व्यवसायांबरोबरच मत्स्यव्यवसायालाही फार मोठ्या प्रमाणावर फटका बसला असल्याचे केंद्र सरकारच्या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले होते. तसेच त्यांनी केंद्राने मच्छीमारांना विशेष पँकेज घोषित करावे यासाठी सरकारच्यावतीने सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर केंद्राने त्यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. दरम्यान केंद्राचे पत्र प्राप्त झाल्यानंतर राज्याच्या मत्स्यविभागानेही सर्व जिल्ह्यांच्या सहा. मत्स्य आयुक्तांना पत्र पाठवुन मच्छीमार संस्थांकडून ठरावीक नमुन्यांत माहिती मागवायला सुरुवात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -