घरताज्या घडामोडीआपत्कालीन व्यवस्थेसाठी जिल्हा नियोजनमधून पाच कोटी मंजूर; उदय सामंत यांची माहिती

आपत्कालीन व्यवस्थेसाठी जिल्हा नियोजनमधून पाच कोटी मंजूर; उदय सामंत यांची माहिती

Subscribe

उदय सामंत यांनी खारेपाटण, कनेडी मल्हार पूल आणि इतर पूरग्रस्त भागाचा दौरा करून पाहणी केली.

जिल्ह्यातील पूर परिस्थिती वेळी खचलेल्या रस्ते, पुलांच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून तात्काळ पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्व रस्ते आणि पुलांची पाहणी करून एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. कनेडी मल्हार पुलासाठी २५ लाख, खारेपाटण येथील रस्त्यासाठी ५० लाख, तर धुप्रतिबंधक बंधारे दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच शेतीचे व व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तिलारी कालवे दुरुस्तीसाठी शासनाकडून ३५ कोटींचा निधी, तर अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी १ कोटी १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी दिली. त्यांनी खारेपाटण, कनेडी मल्हार पूल आणि इतर पूरग्रस्त भागाचा दौरा करून पाहणी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यात पुरामध्ये खचलेले रस्ते, पूल याच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी पाच कोटींचा निधी जिल्हा नियोजनमधून तात्काळ मंजूर करण्यात आला असून पुरामध्ये अनेक रस्ते, पूल वाहून गेले आहेत. काही गावांचा संपर्क तुटला आहे. अशा रस्ते, पुलांची कामे प्राधान्याने केली जाणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व नादुरुस्त रस्ते व पुलांसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. त्यासाठी सर्व पूल व रस्त्याची पाहणी करून एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. अहवाल सादर झाल्यावर शासनाकडून पुरहानीमधून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

- Advertisement -

कनेडी मल्हार पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे तात्पुरती पर्यायी मार्गाची व्यवस्था व्हावी म्हणून नियोजन मधून २५ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि पुलाचे बांधकाम करण्यासाठी ६ कोटींचा निधी लागू शकतो. त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली जाणार असून पुढचा पावसाळा येण्यापूर्वी पुलाचे बांधकाम केले जाणार आहे.

खारेपाटणमध्ये अनेक रस्ते खराब झाले आहेत. त्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पूर आल्यावर लोकांना घाटीवर चढून जाण्यासाठी घाटी बांधली जाणार आहे. हे काम पतन विभागाकडे दिले जाणार आहे. तसेच अनेक धुप्रतिबंधक बंधारे नादुरुस्त झाले असून त्यांच्या तात्पुरत्या दुरूस्तीसाठी ५० लाख मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली.
जिल्ह्यातील पूर हानीत झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शेतीचे आणि व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचेही पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुरहानीचा आढावा घेवून मदत जाहीर करणार आहेत. तौक्ते चक्रीवादळ नुकसानी पोटी ४५ कोटी २५ लाखाची नुकसानभरपाई देण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत २५ कोटी १९ लाखांचे वाटप झाले आहे. लवकरात लवकर वाटप पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -