नाशिक जिल्ह्यात पाच जणांचा बुडून मृत्यू

नाशिक शहरातील दोन, ठाणगाव (सिन्नर) देवळा व पिंपळगाव बसवंत येथील तिघांचा मृत्यू झाल्याचे समजते

Five drowned in Nashik district
Five drowned in Nashik district
नाशिकरोड । नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि.१) गणेश विसर्जनाला गालबोट लागले असून पाच जणांचा सायंकाळ पर्यंत पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यात नाशिक शहरातील दोन, ठाणगाव (सिन्नर) देवळा व पिंपळगाव बसवंत येथील तिघांचा मृत्यू झाल्याचे समजते, यापैकी एकाचा शोध घेण्याचे कार्य उशिरापर्यंत सुरु होते.
मंगळवारी नाशिकरोड जवळील देवळाली गाव येथील नरेश नागेश कोळी(४०) हा व्यक्ती देवळाली गावातील वालदेवी नदीत गणेश मुर्ती विसर्जन करत असतांना बुडाला, अग्निशमन दल व पोलीसांनी शोध घेत त्याचा मृतदेह बाहेर काढला, वालदेवी व दारणा नदीच्या संगमावर कुटुंबियांसमवेत गणेश मुर्ती विसर्जन करतांना अजिंक्य राजाभाऊ गायधनी (२२) याचा पाय घसरुन बुडाला त्याला वाचविण्यासाठी चरण कुंडलीक भागवत याने नदीत उडी घेतली मात्र प्रवाह तीव्र असल्याने भागवत बुडत असल्याचे पाहून मासेमा-यांनी टायर फेकून भागवत यास वाचविण्यात यश आले, तर अजिंक्यचा शोध सुरु आहे, देवळा तालुक्यातील प्रशांत वसंत गुंजाळ(२८) हा मुर्ती विसर्जन करतांना विहिरीत बुडाल्याची घटना घडली, मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. पिंपळगाव बसवंत येथे रविंद्र रामदास मोरे याचा कादवा नदीत बुडाल्याची माहिती आहे.
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील ज्ञानेश्वर बंधा-यात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास काही मुले पोहण्यासाठी गेली होती, यावेळी ओम अण्णासाहेब काकड (१३) याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलीसांनी दिली.