घरमहाराष्ट्रमुंबई-पुणे महामार्गावर अपघात, ५ जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, ५ जणांचा मृत्यू

Subscribe

सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाल्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा सिमेंटचा ट्रक उलटल्यामुळे एक भीषण अपघात मुंबई-पुणे महामार्गावर झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ट्रक चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान मुंबई-पुणे वाहतूक थांबवली असून क्रेनच्या सहाय्याने ही पोती उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. ट्रकचा ताबा सुटल्यामुळे हा ट्रक विरुद्ध दिशेला गेला. या दिशेवरून येणाऱ्या गाड्यांना हा ट्रक धडकला. यातील एक गाडी दरीत कोसळली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातात सीएलओ गाडीतील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -