घरमहाराष्ट्रपाच लाखांच्या मुद्येमालाची बॅग केली परत

पाच लाखांच्या मुद्येमालाची बॅग केली परत

Subscribe

कसारा रेल्वे पोलिसांची स्तुत्य कामगिरी

मुंबई कसारा लोहमार्गावरील डाऊन कसारा लोकल मधील फर्स्ट क्लासच्या डब्यात रॅकवर एक सफेद आणि तपकीरी रंगाची बॅग लोहमार्ग पोलिसांना आढळून आली. ही बॅग ही रेल्वे प्रवासी लोकल मध्ये विसरुन निघून गेल्याचे गस्ती पथकातील शिरसाठ, मोरे, येवले, पादीर व महिला होमगार्ड लता राठोड, संगिता कासार या लोहमार्ग रेल्वे पोलिसांच्या लक्षात आले. .या बॅगची रेल्वे पोलिसांनी तपासणी केली असता बॅगेत अंदाजे 10 ते 12 तोळे सोन्याचे दागिने, 100 ते 150 ग्राम चांदीचे दागिने व रोख रक्कम 7314 रुपये असे एकूण अंदाजे 5 लाख किंमतीचा मुद्देमाल आढळून आला.

ही बॅग लोहमार्ग पोलिसांच्या चौकशीत भारत रामसिंग बनसोडे राहणार मुलुंड पूर्व यांची असल्याचे समजले. बनसोडे हे रेल्वे प्रवासात ही बॅग लोकल मध्ये विसरले होते. त्यांना प्रत्यक्ष कसारा लोहमार्ग पोलीसांनी रेल्वे चौकीत बोलावून ही बॅग त्यांचीच असल्याची खात्री रेल्वे पोलीस व होमगार्ड यांना झाल्यावर भारत बनसोडे यांना त्यातील मुद्येमालासह बॅग सुरक्षितरित्या परत केली. यातून समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी रेल्वे पोलिसांनी दाखवून दिली आहे कसारा पोलिस व महिला होमगार्ड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -