Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी शिंदे सरकारने केल्या पाच जणांच्या बदल्या, डिग्गीकर CIDCOत तर मुखर्जी MMRDAत

शिंदे सरकारने केल्या पाच जणांच्या बदल्या, डिग्गीकर CIDCOत तर मुखर्जी MMRDAत

Subscribe

शिंदे सरकारकडून बदल्यांचं सत्र अद्यापही सुरूच आहे. शुक्रवारी २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या शिंदे सरकारकडून करण्यात आल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा शनिवारी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अनिल डिग्गीकर यांची म्हाडातून सिडकोच्या उपाध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे. तर सिडकोतून संजय मुखर्जी यांना पदोन्नती देत MMRDAचे आयुक्त बनवले आहे. तसेच मनिषा म्हैसकर यांना अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी देण्यात आली असून डॉ. के.गोविंदराज हे नगरविकास खाते(२), प्रधान सचिव म्हणून कामकाज पाहतील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी मुंबई महापालिकेतून नगरविकास खाते(२)मध्ये बदली झालेले आशिष शर्मा यांची २४ तासांतच पुन्हा बदली करण्यात आली. आता शर्मा यांना MMRDAमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून पाठवण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त पी.वेला सारू या दोघांनी आपल्या ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही या दोघांची बदली अद्याप करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यातही काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित आहेत.

या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

- Advertisement -

१) अनिल डिग्गीकर, सिडकोचे उपाध्यक्ष

२) मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग खाते

- Advertisement -

३) डॉ. के. गोविंदाराज, नगरविकास खाते (२)

४) डॉ. संजय मुखर्जी, MMRDA आयुक्त

५) आशिष शर्मा, अतिरिक्त महानगर आयुक्त, MMRDA

शुक्रवारी झालेल्या २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

१) नाशिक महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुणे येथे साखर आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

२) महिला व बाल विकास विकास विभागाच्या प्रधान सचिव इड्जेस कुंदन यांची अल्पसंख्याक विकास भागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. या पदावर अनुप कुमार यादव कार्यरत होते. त्यांच्या जागमी कुंदन यांची बदली करण्यात आली आहे.

३) सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची गृह विभागात बदली करण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव(गृह) पदावर सैनिक यांची बदली करण्यात आली आहे. या पदावर दिनेश वाघमारे कार्यरत होते. आता सैनिक यांच्याकडे या पदी काम करतील.

४) पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांची म्हाडामध्ये बदली करण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जयस्वाल हे काम करतील. अनिल डिग्गीकर हे या पदावर कार्यरत होते.

५) कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांची महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागाचे महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

६) एमएमआरडीएचे महागगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे ओएसडी म्हणून बदली करण्यात आली आहे.

७) बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांची MAHADISCOM चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

८) MAHADISCOM चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी बदली करण्यात आली आहे.

९) राधिका रस्तोगी यांची प्रधान सचिव आणि विकास आयुक्त म्हमून नियोजन विभागात बदली करण्यात आली आहे.

१०) एम. एस. खाडी गाव औद्योगिक बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
अंशू सिन्हा यांची ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

११) अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांची महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

१२) तुकाराम मुंढे यांची मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली आहे.

१३) एमएमबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांची जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

१४) अतिरिक्त विकास आयुक्त (औद्योगिक) डॉ. माणिक गुरसल यांची महाराष्ट्र मेरिटाईम मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.

१५) एसबीएम(ग्रामीण) पाणी पुरवठा विभागाचे सह सचिव व प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांची रेशीम संचालक(नागपूर) म्हणून बदली करण्यात आली आहे.

१६) मनरेगाचे (नागपूर) आयुक्त शंतनू गोयल यांची नवी मुंबई सिडकोचे सह महाव्यवस्थापक पदी बदली करण्यात आली आहे.

१७) लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

१८) एनआरएलएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांची पशु खाद्य विभागाचे आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

१९) डॉ. सुधाकर शिंदे यांची मुंबईचे सहाय्यक महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

२०) मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशिष शर्मा यांची नगर विकास विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.


हेही वाचा : शिंदे सरकारने २० सनदी अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या; सुजाता सौनिक नव्या गृह सचिव


 

- Advertisment -