घरमहाराष्ट्ररायगडमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

रायगडमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

दिल्लीमधील एकाच कुटुंबातील ११ जणांच्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असताना रायगडमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांनी आत्महत्या केली आहे. पाचही जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रायगडमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वेळीच सर्वांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे सुदैवाने सर्व जण बचावले आहेत. या सर्वांवर अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पाटील कुटुंबियांनी उचलले टोकाचे पाऊल

अलिबाग तालुक्यातील आक्षीमध्ये रहाणाऱ्या पाटील कुटुंबियांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या पाच जणांनी शितपेयातून विष घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पाटील कुटुंबियांनी विष घेतल्यानंतर मुलाचा रडण्याचा आवाज आला. त्यामुळे शेजारच्यांनी पाटील यांच्या घराकडे धाव घेतली. घरामध्ये सर्वजम अस्ताव्यस्थ अवस्थेत पडले होते. त्यांनी सर्वांना रुग्णालयात हलविले. या सर्वांवर रायगड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. अतिदक्षता विभागात या सर्वांवर उपचार सुरू आहेत. दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईला हलवण्यात आले आहे.

- Advertisement -

दोन लहान मुलांची प्रकृती चिंताजनक

आक्षी गावातील रामचंद्र पाटील (६०), रंजना पाटील (५०), कविता राहुल पाटील (२५) स्वराली पाटील (दीड वर्ष) आणि स्वराज पाटील (दीड वर्ष) या सर्वांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला पाटील कुटुंबीयांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला? यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. कविता पाटील यांचा नवरा राहुल पाटील मुंबईला नोकरी करतात. दीड वर्षाच्या स्वराली आणि स्वराज यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आले.

अंधश्रध्देच्या दृष्टीने तपास सुरु

रुग्णालय प्रशासनाने याप्रकरणी अलिबाग पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पाटील यांच्या घरामध्ये पोलिसांना शितपेय सापडले. पोलिसांनी ते तपासासाठी पाठवले आहे. सामुहिक आत्महत्या का केली याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरु आहे. हे प्रकरण अंधश्रध्देशी संबंधित आहे की नाही याचा देखील पोलिसांकडून तपास सुरु आहे.

- Advertisement -

सामुहिक आत्महत्येची आतापर्यंतची प्रकरणे

मुंबईतील दोन आठवड्यापूर्वी एकाच कुटुंबातील सामुहिक हत्येचे दोन प्रकार समोर आले होते. कफ परेड भागामध्ये पटेल कुटुंबियांतील ३ जणांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. तर वांद्र भागातील भिंगारे कुटुंबातील ४ जणांनी झुरळाचे औषध पिऊन आत्महत्या केली होती. दुसरीकडे दिल्लीमध्ये ४ दिवसापूर्वी एकाच कुटुंबातील ११ जणांनी सामुहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -