Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सोनपेठ तालुक्यात पाच सफाई कामगारांचा मृत्यू, शासनाकडून 10 लाखांची मदत

सोनपेठ तालुक्यात पाच सफाई कामगारांचा मृत्यू, शासनाकडून 10 लाखांची मदत

Subscribe

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात असलेल्या भाऊचा तांडा येथे गुरूवारी रात्री (ता. 11 मे) सेप्टिक टँकची सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गुरूवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात असलेल्या भाऊचा तांडा येथे गुरूवारी रात्री (ता. 11 मे) सेप्टिक टँकची सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गुरूवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनेमधून ही मदत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर यांतील एका कामगाराचा जीव बचावला असून त्याच्यावर परळी येथील रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. (Five scavengers died in Sonpeth taluka, 10 lakhs help from the government)

हेही वाचा – शोध बेपत्ता मुलींचा : गरीब मुली शोधण्यासाठी मिळायचे १० हजार; आरोपी महिलेने काय सांगितले?

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी आणि सोनपेठ मधील काही कामगारांकडून परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा या शिवारातील एका शेतातील घराच्या येथे असलेले सेफ्टीक टॅंक स्वछ करण्याचे कंत्राट घेण्यात आले होते. काल (11 मे) रात्री शेख सादेक, शेख जुनेद, शेख शाहरूख, शेख नवीद, शेख फेरोज, शेख साबेर हे सहा जण सेफ्टीक टॅंक स्वछ करत होते. यांच्यातील एक कामगार हा टॅंकवरती होता. हा टॅंक स्वछ करण्यासाठी या कामगारांनी मशीनही आणलेली होती. हे काम सुरू असतानाच या कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे या कामगारांचा मृत्यू हा गुदमरून झाला की, त्यांना मशीनचा शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला हे कळू शकलेले नाही.

दुर्दैवी बाब म्हणजे या घटनेत शेख सादेक (वय 55), शेख जुनेद (वय 32), शेख शारोक (वय 28), शेख नवीद (वय 28), शेख फेरोज (वय 29) या पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर शेख साबेर हे अत्यवस्थ असल्याने त्यांना तत्काळ परळी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतर पाच जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती देण्यात आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांना या घटनेची माहिती होताच त्वरित आवश्यक ती मदत देण्याच्या सूचनाही त्यांना प्रशासनाला दिल्या.

- Advertisment -