घरमहाराष्ट्रपुणेपुण्याच्या शिवसेना शहर प्रमुखांसह पाच शिवसैनिकांना अटक, उदय सामंत हल्लाप्रकरणी पोलिसांची कारवाई

पुण्याच्या शिवसेना शहर प्रमुखांसह पाच शिवसैनिकांना अटक, उदय सामंत हल्लाप्रकरणी पोलिसांची कारवाई

Subscribe

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांतच पुणे पोलिसांनी हल्लेखोरांची धरपकड केली आहे.

शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्यावर मंगळवारी रात्री पुण्यातील कात्रज चौकात हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई केली असून पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांतच पुणे पोलिसांनी हल्लेखोरांची धरपकड केली आहे.

हेही वाचा – आमच्या सहनशिलतेचा अंत कुणी पाहू नका, उदय सामंतांचा हल्लेखोरांना इशारा

- Advertisement -

मंगळवारी शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांची पुण्यात सभा होती. आदित्य ठाकरे यांची कात्रज चौकातील सभा संपल्यानंतर कार्यकर्त्यांना त्या मार्गांवरून उदय सामंत यांची कार दिसली. या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्या कारची मागची काच फोडली. यामुळे कारमधील एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी उदय सामंत यांनी तत्काळ पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. काही हल्लेखोरांचे फोटोही यावेळी दिले. दरम्यान, याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई व्हावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यामुळे पोलिसांनीही आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि पाच जणांना अटक केली. यामध्ये शिवसंवाद सभेचे मुख्य आयोजक संभाजी थोरवे, राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार आणि पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – विनाकारण शिवसेनेला बदनाम करू नका, नीलम गोऱ्हेंचा पलटवार

- Advertisement -

या शिवसैनिकांवर कलम ३०७ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, हिंगोलीचे शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात यांनाही पोलिसांनी बुधवारी सकाळी ताब्यात घेतले आहे. त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – भडकाऊ भाषण करून चितावणी देणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार, एकनाथ शिंदेंचा इशारा

बबन थोरातांनी चिथवलं?

बबन थोरात यांनी १ ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणामुळे शिवसैनिक चिथवले गेले असं म्हटलं जातंय. तुमच्या कार्यक्षेत्रात गद्दार आमदारांच्या गाड्या येतील. तेव्हा गद्दारांची गाडी जो शिवसैनिक पहिल्यांदा फोडेल त्याचा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गौरव केला जाईल, असं बबन थोरात यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळेच कार्यकर्त्यांनी उदय सामंतांची गाडी फोडली असं म्हटलं जात आहे. त्यामुळे चौकशीसाठी त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -