घरमहाराष्ट्रएसटी महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार बसेस होणार दाखल

एसटी महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार बसेस होणार दाखल

Subscribe

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थातखेडेगावातील प्रवाशांच्या लालपरीने अलीकडेच 62 वर्षे पूर्ण केली. आधीच आर्थिक संकटात अडकलेले एसटी महामंडळ कोरोना महामारी आणि संपामुळे डबगाईला आले. हजारो कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले. ज्यामुळे मोठा आर्थिक फटका एसटी महामंडळाला सहन करावा लागला. अशा परिस्थितीत सरकारच्या मदतीने आता एसटी महामंडळ सावरण्याचा प्रयत्न करत आहे. (five thousand electrical buses in msrtc adb bank helps maharashtra govt said cm eknath shinde)

याचाच एक भाग म्हणून आता राज्य परिवहन महामंडळात 5000 बसेस दाखल होणार आहेत. यातील 5150 इलेक्ट्रिकल बसेस येणार आहेत.  त्याचबरोबर 5000 डिझेल बसेसचे सीएनजीवर रुपांतर करत वापरात येणार आहेत. यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक राज्य सरकारला मदत करणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे शिष्टमंडळ सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेत चर्चा केली.

- Advertisement -

एडीबी बँकेच्या शिष्टमंडळ प्रतिनिधींनी, राज्यातील नदी जोड प्रकल्प, वाया जाणारे पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठीचे प्रकल्प आणि राज्य परिवहन महामंडळासाठी 5150 इलेक्ट्रीकल बसेस, त्याचबरोबर 5000 डिझेल बसेसचे सीएनजीवर रुपांतर करणे यांसारख्या प्रकल्पांना सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान या शिष्टमंडळातील सदस्यांनी राज्यभर दौरे करून विविध प्रकल्पांच्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला आहे.

सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी समुह विकास प्रकल्पांसोबतच राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प, पर्यावरण स्नेही नवीन महाबळेश्वर प्रकल्प, पर्यटनाला चालना देणारा मुंबई सिंधुदूर्ग सागरी महामार्ग प्रकल्प तसेच नदीजोड प्रकल्प, नाशिक, ठाणे आणि पुणे मेट्रो प्रकल्पांना एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले आहे.

- Advertisement -

राज्यात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसोबतच दुर्गम आणि दुष्काळग्रस्त भागात कृषी, आरोग्य, शिक्षणाला शासनाने प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रासाठी अमेरिकेने आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.


राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेला राष्ट्रवादीचा पाठिंबा; अनेक नेते होणार सहभागी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -