घरमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

Subscribe

शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते रवी पाटील यांच्यावर सहा ते सात अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये पाटील गंभीर जखमी झाले आहेत.

सध्या लोकसभा निवडणूकचे वारे वाहत आहेत. देशभरात पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले असून उद्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यावर सहा ते सात अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. रवी पाटील असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. या हल्ल्यात रवी पाटील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना ताबोडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी तमिळनाडूमध्ये भाजपच्या वृद्ध कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यामध्ये त्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रवी पाटील यांच्यावर मंगळवारी रात्री काही लोकांनी प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोर सहा ते सात इसमांनी लोखंडी रॉडने रवी पाटील यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात रवी पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांना ताबोडतोब जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, हल्ला करणाऱ्या अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -