घरमहाराष्ट्रजगात मधुमेहाचे पाच प्रकार; स्वीडनमधील डॉक्टरांचा दावा

जगात मधुमेहाचे पाच प्रकार; स्वीडनमधील डॉक्टरांचा दावा

Subscribe

जगात मधुमेहाचे दोन प्रकार नसून पाच प्रकार असल्याचा दावा स्वीडनमधील डॉक्टरांनी केला आहे.

मधुमेहाचे टाईप १ आणि टाईप २ हे दोन प्रकार असतात. मात्र स्वीडनमधील डॉक्टरांनी मधुमेहाचे दोन प्रकार नसून पाच प्रकार असल्याचा दावा केला आहे. स्वीडन येथील लूंड विश्वविद्यालयातील डायबेटिक सेंटरचे संचालक डॉ. लीफ ग्रुप यांनी केला आहे. त्यांनी सुमारे १५ हजार मधुमेह झालेल्या रुग्णांचे वय, उंची यांसह विविध घटकांचा अभ्यास करुन हे हा दावा केला आहे. चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित तिसरी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद शनिवारापासून पुण्यात सुरु झाली आहे. त्यामध्ये जगभरातील तज्ज्ञ डॉक्टर आणि संशोधक सहभागी झाले आहेत. उद्धाटनाच्या कार्यक्रमानंतर डॉ. ग्रुप यांनी पत्रकार परिषद घेत मधुमेहाच्या पाच प्रकाराची माहिती दिली आहे.

हे आहेत मधुमेहाचे प्रकार

भारतात केवळ दोन प्रकारच्या मधुमेहाचे प्रकार असतात. त्यातल्या पहिल्या प्रकारात (टाइप-१) शरीरात इन्सुलिन नाममात्र तयार होते किंवा पूर्णपणे नष्ट झालेले असते. तर दुसर्‍या प्रकारात (टाइप-२) स्थूलतेमुळे शरीरातील इन्सुलिनच्या क्षमतेला अवरोध निर्माण होतो. परिणामत: रक्तातली साखर वाढत राहते. भारतात मधुमेहाचे रुग्ण बहुतांशी या दुसर्‍या प्रकारचे आहेत. तर क्लस्टर ३ मध्ये शरीरातील इन्सुलिन नीट काम करत नसल्याने मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात. त्याचप्रमाणे क्लस्टर ४ हा जास्त लठ्ठपणामुळे होतो. तसेच क्लस्टर ५ वाढत्या वयामुळे होतो. या प्रकारानुसार रुग्णाला कोणते उपचार? कोणते डायट आणि कोणता व्यायाम करावा याचाही अभ्यास केला आहे. त्यामुळे मधुमेह आटोक्यात आणणे अधिक यशस्वी ठरत आहे.

- Advertisement -

जगभरातील पंधरा हजार मधुमेहग्रस्त रुग्णांचा अभ्यास केला असून त्यातून हे पाच मधुमेहाचे प्रकार निदर्शनास आले आहे. तसेच त्यांच्यावर उपचार करणे शक्य झाले आहे.  – डॉ. लीफ ग्रुप, डायबेटिक सेंटर, लूंड विद्यापीठ, स्वीडन


वाचा – वेळीच ओळखा मधुमेह

- Advertisement -

वाचा – मधुमेहींनो, ‘ही’ आहे इन्सुलिन घेण्याची सोपी पद्धत!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -