घरमहाराष्ट्रपुण्यात लागले नगरसेवक हरवल्याचे फ्लेक्स

पुण्यात लागले नगरसेवक हरवल्याचे फ्लेक्स

Subscribe

पुणे विभागातील महत्वपूर्ण बातम्या वाचा एका क्लीकवर.....

 

सामान्य नागरिकांना प्रभागातील समस्यांवर उपाययोजना होण्याकरिता फ्लेक्सची शक्कल लढवली आहे.रोडवर ड्रेनेज मैलापाणी,रस्त्याची प्रचंड दुरावस्था यामुळे अपघातांची मालिका सुरूच अशा मजकुराचा पुण्यात फ्लेक्स लागला असून नगरसेवक हरवले आहेत अस फ्लेक्स वरती लिहिलेलं आहे. या फ्लेक्सबाजीची पुणे शहरात एकच चर्चा सुरू आहे. मात्र हा फ्लेक्स कोणी लावला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.‘पुणे तिथं काय उणे असे’ असताना पुणे शहर हे पुणेरी पाट्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.या शहरात मागील काही महिन्यांपासून शहरातील नागरी समस्यांमधून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे.

- Advertisement -

सोमवारी पुण्यातील प्रभाग क्रमांक ३३ मधील चव्हाण बागेच्या परिसरात नगरसेवक हरवले आहेत.अशा मजकुराचे फ्लेक्स लावल्याने या फ्लेक्सची चर्चा पुणे शहरात सुरू झाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीपूर्वी शहरातील अनेक भागात नगरसेवक हरवले आहेत.अशा फ्लेक्सबाजीतून नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रकार घडला होता.या फ्लेक्सबाजीला दीड वर्ष होत नाही तोच सोमवारी पुण्यातील प्रभाग क्रमांक ३३मध्ये नगरसेवक हरवले आहेत.रोडवर ड्रेनेज मैलापाणी,रस्त्याची प्रचंड दुरावस्था,अपघातांची मालिका सुरू अशा मजकुराचा असलेले फ्लेक्स लावण्यात आले आहे.या फ्लेक्सबाजीची पुणे शहरात एकच चर्चा ऐकण्यास मिळत आहे.आणखी काही वेगळे फ्लेक्स पाहण्यास मिळू शकतात त्यामुळे त्याचे लावल वाटायला नको.


 

- Advertisement -

जबरदस्तीने दहीहंडीची वर्गणी गोळा करणार्‍यास अटक

पुणे । पुण्याच्या हडपसर भागात जबरदस्तीने दहीहंडीची वर्गणी गोळा करण्याचा प्रकार समोर आला आहे. या गुंडांनी काही व्यापार्‍यांकडून ‘बघून घेऊ’ अशी धमकी देऊन वर्गणी गोळा केली आहे. एका व्यापार्‍याने त्याची तक्रार केल्यामुळे एका गुंडाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. वर्गणीसाठी कोणी धमकी देत असेल तर पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी दिले आहे. बंटर शाळेजवळील दुकानात येऊन आरोपी विशाल मिरेकर आणि इतर दोघे जण उत्सवासाठी २ हजार रुपयांची वर्गणी मागत असल्याची माहिती समोर आली.आरोपींनी व्यापार्‍याकडे २हजार रुपयांची वर्गणी मागितली होती.त्यावर व्यापार्‍याने मला अनेक मंडळांना वर्गणी द्यावी लागते. त्यामुळे तुम्ही ३०० रुपये घ्या, अशी विनंती केली. तेथून चिडलेल्या आरोपींनी त्यांना तुझा काटा काढू असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली व १ हजार रुपयांची वर्गणी घेतली.

आरोपींनी गेल्यावर्षी देखील हाच प्रकार केला होता.हा प्रकार हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही मंडळांचे कार्यकर्ते व्यापार्‍यांकडून दहीहंडी उत्सवासाठी जबरदस्तीने वर्गणी गोळा करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक वैजिनाथ पुणे, हवालदार युसूफ पठाण, राजेश नवले, राजू वेगरे आणि सैदोबा भोजराव हे हडपसर येथे पेट्रोलिंग करण्यासाठी गेले. त्यांनी काही व्यापार्‍यांशी त्यांच्या समस्यांबाबत विचारपूस केली. त्यामुळे पोलिसांनी व्यापार्‍यास विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली.मिरेकरच्या विरोधात आतापर्यंत चार ते पाच निनावी अर्ज आले आहेत. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. उत्सवाच्या नावाखाली जबरदस्तीने वर्गणी मागत असल्यास त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी, असे आवाहन वानवडी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद पाटील आणि हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी केले आहे.


 

चालक,वाहकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा

पिंपरी-चिंचवड । रक्षाबंधनासाठी बहीण -भावांची भेट घडवून आणणार्‍या परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगारातील बस चालक, वाहकांना राखी बांधून रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे रक्षाबंधन साजरा करण्यात आला. राज्याच्या विविध भागातून पिंपरी,वल्लभनगर आगारात परिवहन महामंडळाची बस घेऊन आलेल्या चालकांना रोटरी क्लबतर्फे राखी बांधण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे,वल्लभनगर आगाराचे व्यवस्थापक संजय भोसले, वाहतूक नियंत्रक हेमंत खामकर यांच्यासह चालक, वाहक इतर कर्मचारी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे म्हणाले, ’रक्षाबंधन हा सन बहिण-भावाच्या अतूट नात्याचा सण आहे. यादिवशी प्रत्येक बहीण आपल्या लाडक्या दादाला राखी बांधून त्याच्यावरील प्रेम व्यक्त करते. रक्षाबंधन असूनही बस चालक, वाहक कामावर हजर राहून अनेक बहिणींची भावासोबत भेट घडवून आणतात.या चालक, वाहकांना राखी बांधण्यासाठी रक्षाबंधनदिवशी बहिणीकडे जाता येत नाही.त्यामुळेच रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे चालक,वाहकांना

राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला’


 

ट्रक अडवून चालकाला मारहाण

पुणे | भंगार घेऊन जाणा-या ट्रकला अडवून ट्रकची काच फोडली आणि चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार आळंदी येथे घडली.राम पवार (38, रा. निगडी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सागर लोखंडे, अक्षय लोखंडे (दोघेही रा. ता. खेड) आणि अन्य एक साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार त्यांच्या ट्रकमध्ये स्क्रॅप मटेरियल भरून आळंदी येथील वजन काट्यावर वजन करण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपींनी मोटारसायकल वरून येऊन मोटारसायकल ट्रकसमोर उभी केली. त्यामुळे पवार यांनी ट्रक थांबवला. आरोपींनी ट्रकच्या समोरच्या काचेवर सत्तूरने वार करून काच फोडली. त्यानंतर तिघांनी मिळून शिवीगाळ व दमदाटी करून बेदम मारहाण केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


’डाई-ईची’ कंपनीचे स्थलांतर सुरू, कामगारांचा तीव्र विरोध

पुणे |  पुणे-मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील ’डाई-ईची’ कंपनीच्या व्यवस्थापनाने बेकायदेशीररित्या स्थलांतर सुरू केले आहे. याला कंपनीतील कामगारांनी तीव्र विरोध केला असून पासून कंपनी प्रवेशद्वारासमोर हिंद कामगार संघटनेच्या (इंटक) वतीने ठिय्या आंदोलन इंटकचे जिल्हा अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले आहे. कदम म्हणाले की, ’डाई-ईची करकरिया’ ही कंपनी पुणे-मुंबई महामार्गावर कासारवाडी येथे ५४ वर्षापूर्वी सुरू करण्यात आली. या कंपनीत उत्पादनाशी संबंधित शेकडो कामगार काम करत आहेत. परंतू मागील काही दिवसांपासून कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना व कामगार संघटनेला पूर्णत: अंधारात ठेवून अचानकपणे कंपनी गुजरात येथे स्थलांतरीत करण्यासाठी सुरू केली आहे.


सार्वजनिक सायकल सुविधा प्रकल्पास प्रारंभ

bicycleपुणे | पिंपरी-चिंचवड शहर प्रदूषणमुक्त व सर्वांसाठी आरोग्यदायी असावे त्यासाठी नागरिकांनी सायकल शेअरींगचा वापर करून आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवावे असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड मार्फत एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत सार्वजनिक सायकल सुविधा प्रकल्पाचा प्रारंभ पिंपळे सौदागर ते पिंपळे गुरव सायकल चालवून आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला. त्यावेळी महापौर राहुल जाधव बोलत होते. महापौर जाधव म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकीकमध्ये या प्रकल्पामुळे भर पडणार असून दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतुकीच्या समस्येला आळा बसेल व नागरिकांना त्याचा लाभ होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -