घरताज्या घडामोडीकाहीही करा पण, आम्हाला उभं करा, पूरग्रस्त महिलेचा मुख्यमंत्र्यांसमोर टाहो

काहीही करा पण, आम्हाला उभं करा, पूरग्रस्त महिलेचा मुख्यमंत्र्यांसमोर टाहो

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नागरिकांना धीर देण्याचाही प्रयत्न

राज्यात कोकण आणि कोल्हापूर, सांगली भागात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण शहर पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणमधील पूर ग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी एका पूरग्रस्त महिलेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर आपली व्यथा मांडत टाहो फोडला आहे. काहीही करा पण आम्हाला उभं करा अशी मागणी एका पूरग्रस्त महिलेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यावेळी महिलेचा अश्रूंचा बांध फुटला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूमधील भागाची पाहणी करुन मदतीचं आश्वासन दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दरड कोसळून दुर्घटना झालेल्या तळीये गावाची पाहणी केली तर रविवारी चिपळूमधील बाजारपेठेची पाहणी करण्यास चिपळूणमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी बाजारपेठेतील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या व्यथा मांडल्या आहेत. नागरिकांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठिय्या मांडत आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका असे म्हटलं होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना धीर देण्याचाही प्रयत्न केला आहे. बाजारपेठेतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नगारिकांशी सवांद साधून सर्वोतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिलं आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दौऱ्यादरम्यान आमदार भास्कर जाधव, मुख्य सचिव सीताराम कुंटे, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत उपस्थित होते. चिपळूणमधील पाहणी दौऱ्या आटोपल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठकही घेतली आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिलं आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारकडून सहकार्य

केंद्र सरकारकडून दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला होता. एनडीआरएफ, आर्मी, नेव्ही एअरफोर्स देऊ असे सांगितले आहे. दुरगामी सेवांसाठी त्यांचे सहकार्य पाहिजे आहे. कोविड मुळे आर्थिक परिस्थिती मंदावली आहे. त्याच्यामुळे संकट येत असून त्यावरही सामना करत आहोत. त्वरित केंद्राकडे मागणी करणार नाही वस्तुस्थितीवर आधारित अशी मागणी करण्यात येणार आहे. सगळा आंदाज आल्यावर मागणी करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.


हेही वाचा : कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, सर्वोतोपरी मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -