घरट्रेंडिंगगुजरातला मुसळधार पावसाचा फटका; पूरस्थितीमुळे नागरिकांचे हाल

गुजरातला मुसळधार पावसाचा फटका; पूरस्थितीमुळे नागरिकांचे हाल

Subscribe

देशभरात मान्सून सक्रीय झाला असून, मुसळधार पावसामुळे अनेक राज्यातील रस्ते जलमय झाले असून, पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना मोठा फटका बसला आहे. रविवारी गुजरातमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

देशभरात मान्सून (Monsoon) सक्रीय झाला असून, मुसळधार पावसामुळे अनेक राज्यातील रस्ते जलमय झाले असून, पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना मोठा फटका बसला आहे. रविवारी गुजरातमध्ये मुसळधार पावसाने (Heavy rainfall in gujrat) हजेरी लावली होती. त्याचवेळी अनेक जिल्ह्यांतील सखल भागात पाणी साचल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे मदत आणि बचावासाठी एनडीआरएफची टीम (NDRF Team) दाखल झाली आहे. (flood in gujarat madhya pradesh due to heavy rainfall imd issues red alert in gadchiroli)

मुसळधार पावसामुळे गुजरातला मोठा फटका बसला आहे. गुजरातच्या नवसारी येथे पावसाचा जोर कायम असल्याने एक बोट नदीत बुडाली. तसेच, वलसाडमध्ये नद्यांच्या उधाणामुळे सर्व काही बुडू लागले आहे. परिणामी, मदत आणि बचावासाठी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. शिवाय, पूर आल्याने लोकांना घरातून बाहेर काढण्यात येत आहे.

- Advertisement -

सध्या पाणी जास्त असल्याने बचाव करणे कठीण होत आहे. गुजरातमधील अहमदाबाद, नवसारी आणि वलसाड आणि मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अहमदाबादच्या प्रल्हादपूर, आनंदनगर, जीवराजपार्क, वेजलपूर या सर्व भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरल्याने घरात देखील पाणी शिरले आहे. गुजरातसह मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

- Advertisement -

राज्यातील 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने राज्यातील 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे. त्यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा सहभाग आहे. तसेच मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद,जालना, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.


हेही वाचा – अतिवृष्टीमुळे नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला; तर 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -